26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरविशेषपश्चिम रेल्वेतून रोज अस्वच्छतेचा प्रवास

पश्चिम रेल्वेतून रोज अस्वच्छतेचा प्रवास

पश्चिम रेल्वे सर्वाधिक 'अस्वच्छ'

Google News Follow

Related

भारतामध्ये सर्वाधिक सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा मानला जातो. त्यासोबतच लांब पल्याचा प्रवास किफायतशीर दरात आणि वेगवान होण्यासाठी नागरिक मेल, एक्सप्रेस सारख्या गाडयांना प्राधान्य देतात. मात्र आता याच मेल-एक्सप्रेसमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. अशी तक्रार प्रवासी वारंवार ‘रेल मदत ऍप’ वर करत आहेत. तसेच सर्वाधिक अस्वच्छतेच्या तक्रारी या पश्चिम रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरीकाकांकडून करण्यात येत आहेत.

रेल्वे संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘रेल मदत ऍप’ हे एप्लिकेशन प्रवाशांच्या तक्रारीसाठी उपलब्ध करून दिले आहे. तसेच ऍपमध्ये तक्ररीच्या पाठपुराव्यांसाठी देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एप्रिल ते ओक्टोबर महिन्यांच्या कालावधीमध्ये देशभरातील १६ क्षेत्रीय भागातील रेल्वेच्या एकून १ लाख २१ हजार ७५४ अस्वच्छतेच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच सर्वाधिक पश्चिम रेल्वे संबंधित प्रवाशांनी १९ हजार १८९ तक्रारी केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर रेल्वेच्या प्रवाशांनी १४ हजार ८२६ तक्रारी दाखल केल्या आहेत. तर मध्य रेल्वेवर प्रवाशांनी ६ हजार ३०२ अस्वच्छतेबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.

हे ही वाचा :

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

तसेच मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वेवर प्रवाशांनी तीनपट अधिक तक्रारी नोंदविल्या आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म संबंधित अस्वच्छतेच्या ५५४ तर लांब पल्यांच्या गाड्यांमधील अस्वच्छतेबाबत १८ हजार ६२३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये स्वच्छतेसाठी ‘ऑनबोर्ड हाऊस किपिंग सर्व्हिस’ आहे. तसेच या तक्रारीच्या निवारण करण्यासाठी रेल्वेकडून १५ दिवसांसाठी विशेष स्वच्छता मोहित राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा