30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषरविवारी सूर्या चमकला, कीवींचा पराभव झाला

रविवारी सूर्या चमकला, कीवींचा पराभव झाला

टीम इंडियाने उडवला न्यूझिलंडचा ६५ धावांनी धुव्वा

Google News Follow

Related

सूर्यकुमारचा प्रकोप टी-२० वर्ल्डकपनंतरही कायम पाहायला मिळतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सूर्याने विस्फोटक फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे दुसरे शतक. सूर्याने अवघ्या ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. शेवटच्या पाच षटकांमध्ये सूर्यकुमार यादव कीवीचा कर्दनकाळ ठरला आणि मैदानाच्या चारही दिशांना फटकेबाजी केली. ही खेळी इतकी विस्फोटक होती याचा अंदाज फक्त आकडेवारीवरून लावू शकतो. कारण सूर्याने त्याचे अर्धशतक ३२ चेंडूत पूर्ण केले आणि त्याने शतक पूर्ण केले ते ४९ चेंडूत. सूर्याने डावाच्या शेवटपर्यंत कीवी गोलंदांजाची धुलाई केली आणि नाबाद राहून ५१ चेंडूत १११ धावा वसूल केल्या. भारताने आपल्या डावात सहा विकेट्सच्या मोबदल्यात १९१ धावांचा डोंगर उभारला. धावांचा पाठलाग करणाऱ्या कीवी फलंदाजांना हे आव्हान पेलवले नाही. कीवीचे फलंदाज अवघ्या १२६ धावापर्यंत मजल मारू शकले आणि न्यूझिलंडचा ६५ धावांनी धुव्वा उडवून भारताने हा सामना जिंकला. भारताने तीन सामन्याच्या सीरिजमध्ये आता आघाडी घेतली आहे. याचाच अर्थ ही मालिका एकतर टीम इंडिया जिंकू शकेल किंवा ड्रॉ होऊ शकेल.

एकीकडे आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत सूर्याने ११०० धावा झोडपून काढल्या आहेत. एकीकडे जगातील मातब्बर फलंदाजांना १००० धावाही पूर्ण करता आलेल्या नाहीत आणि दुसरीकडे सूर्या आग ओकतोय. सूर्याने या सामन्यात शतक झळकावून रोहीत शर्माच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. रोहीतने २०१८ मध्ये एका वर्षात दोन शतके ठोकली होती.

न्यूझिलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास भारताला पाचारण केले. भारताने सहा विकेट्सच्या मोबदल्यात १९१ धावा वसूल केल्या. त्यात सूर्यकुमार यादवचा वाटा होता १११ धावांचा. सूर्याने कीवी गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या ५१ चेंडूत १११ धावा चोपून काढल्या. या खेळीत त्याने ७ गगनभेदी षटकार मारून कीवी गोलंदाजांना आसमंत दाखवले. एवढ्यावरच न थांबता त्याने ११ चौकारही लगावले. इतर भारतीय फलंदाज एकामागोमाग बाद होत असताना सूर्या मात्र तळपत राहिला आणि त्याने धावांचा डोंगर उभारला. ईशान किशन ३६ धावा, हार्दिक आणि श्रेयस्स अय्यर यांचा १३ धावांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. एका बाजूला विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूला सूर्या आग ओकत होता आणि त्यात कीवीचे गोलंदाज होरपळून निघत होते. सूर्यकुमार यादवने यापूर्वी इंग्लंविरुद्ध त्यांच्याच मातीत ११७ धावांची शानदार खेळी होती.

हेही वाचा :

कांस्यपदक जिंकून मनिकाने केली सोनेरी कामगिरी

तबस्सुम…खिला फूल मुरझा गया

कर्नाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेचा २७ तासांचा मेगाब्लॉक

सूर्यकुमारने २०२२ वर्ष आतापर्यंत गाजवले आहे. त्याने आतापर्यंत ३० सामन्यांच्या ३० डावांमध्ये ११५१ धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि ९ अर्धशतके ठोकली आहेत. या आकडेवारीवरून त्याने ११ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. त्याचा स्ट्राइक रेट होता १८८. तो ६ वेळा नाबादही राहिला आहे. या वर्षात त्याने ६७ षटकार आणि १०५ चौकार मारले आहेत.

आधी सूर्यकुमार यादवची अप्रतिम खेळी आणि नंतर भारतीय गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा ६५ धावांनी धुव्वा उडवला आहे. सूर्यकुमारच्या १११ धावांच्या स्फोटक फलंदाजीमुळे १९१ धावांचा डोंगर भारताने उभारला. टिम साउदीने जर २० षटकात हॅट्ट्रीक घेत जर भारताला रोखले नसते, तर धावांचा डोंगर अजून वाढला असता. तरीदेखील या धावांच्या दडपणाखाली कीवी फलंदाज एका मागोमाग तंबूत परतले. केन विलियम्सनच्या ६१ धावांचा अपवाद वगळता बाकी कीवी फलंदाजांनी हाराकीरी केली. भारताच्या दीपक हुड्डा याने २.५ षटकात ४ फलंदाजांची शिकार केली. त्याला युजवेंद्र चहल, सिराज याने चांगली साथ देत २ विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा