33 C
Mumbai
Sunday, May 28, 2023
घरविशेषरामलला २२ जानेवारीला गाभाऱ्यात होणार विराजमान !

रामलला २२ जानेवारीला गाभाऱ्यात होणार विराजमान !

ऑक्टोबरपर्यंत रामलल्लाच्या मूर्तीचे बांधकाम आणि सप्टेंबरपर्यंत गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण

Google News Follow

Related

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर झालेली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी स्थायी गर्भगृहात रामलल्लाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सराफा मंडळाच्या प्रांतीय अधिवेशनात बोलताना चंपत राय म्हणाले की, स्थायी गर्भगृहात रामललाची स्थापना २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, ऑक्टोबरपर्यंत रामलल्लाच्या मूर्तीचे बांधकाम आणि सप्टेंबरपर्यंत गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. गर्भगृहाच्या बांधकामात मकराना संगमरवराचा वापर केला जात आहे. तळमजल्यावर फक्त रामललाचेच स्थान असणार आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार होणार, तर दुसरा मजला रिकामा असेल. शिखर, आसन, दरवाजांना सोन्याचा वापर केलेला आहे. गर्भगृहात जाण्यासाठी ३४ पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. अयोध्येतच रामललाचा पुतळा उभारला जाईल. तो पुतळा एका पाच वर्षांच्या मुलाचा असणार आहे.

नुकतेच अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने श्रीराम मंदिर उभारणीचे फोटो प्रसिद्ध केले होते.  उंचावरून घेतलेल्मोया या फोटोंमध्ये मंदिराचा आकार स्पष्टपणे दिसत आहे. मंदिराच्या बाहेरील भिंती बांधण्यात आल्या असून तळमजल्याचा पूर्ण आकार दिसत आहे.

हेही वाचा :

बसमध्ये इयरफोनशिवाय ऑडिओ, व्हिडिओ ऐकले तर ५ हजारांचा दंड, तीन महिने शिक्षा

अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू

जनता दलाचे नेते कैलाश महतो यांची गोळी झाडून हत्या

जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने फोटो शेअर करत लिहिले, रामभक्तांच्या शतकानुशतके अविरत लढ्याचा संघर्ष म्हणून प्रभू श्रीरामललाचे दिव्य मंदिर आता आकार घेताना दिसत आहे, जय श्रीराम!  या फोटोंसोबत एक व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तळमजल्यावरील बांधकाम आतून दाखवण्यात आले होते.

तळमजला आकार घेतोय

तळमजल्यावरील खांब आणि भिंतींने मंदिर आकार घेतोय. आता तळमजल्याचे छप्पर बांधले जात आहे. मंदिराच्या जागेवर बांधकाम एजन्सीचे लोक काम करताना दिसत आहेत. तळमजल्यावरील खांबांवर बीम टाकण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी ६ एप्रिल रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हे फोटो जारी केले होते.  त्या फोटोंमध्ये प्रवेशद्वाराचा पूर्ण आकार दिसत होता.  त्यात तळमजल्यावरील स्तंभ दाखवण्यात आले होते. बीम टाकण्याचे काम सुरू झाल्याचेही सांगण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,020अनुयायीअनुकरण करा
74,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा