33 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेषआता मॉरिशसमध्येही ''शिवरायांचा जयजयकार'' !

आता मॉरिशसमध्येही ”शिवरायांचा जयजयकार” !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १४ फुटी उंचीचा पुतळ्याचे होणार अनावरण

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी आज सकाळी मॉरिशस येथे आगमन झाले आहे.या दौऱ्यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांची उपस्थिती असणार आहे. मॉरिशस मध्ये आज मॉरिशस इंडिया बिझनेस समुदायाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशस मधील विविध कंपन्यांशी भेट होतील.

तसेच येथे काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार आहेत.मॉरीशसमध्ये मराठी बांधवांची संख्या जवळपास ७५ हजार आहे.महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, रत्नागिरी ,पुणे या भागातील लोक मॉरिशस मध्ये स्थित आहेत.हे सर्व मॉरिशसमध्ये मराठी परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचे काम करत आहेत.जवळपास मराठी बांधवांच्या येथे ५४ संघटना आहेत.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फुटी उंचीचा पुतळा आज मॉरिशस मध्ये बसवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

बसमध्ये इयरफोनशिवाय व्हीडिओ, ऑडिओ ऐकलात तर कान पकडणार!

सरकारी बंगला बांधण्यासाठी चक्क ऐतिहासिक वास्तू केली जमीनदोस्त

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनाला जा आता लिफ्टने!

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉरिशस येथील मराठी भवनासाठी ८ कोटी रुपये देणगी स्वरूपात दिले आहे.ही देणगी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द केली जाणारा आहे.या दौऱ्यात मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेट देवेंद्र फडणवीस घेतील.सोबत मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री गानू ही उपस्थित असतील.त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांची भेट देवेंद्र फडणवीस घेतील.

या दौऱ्यात पर्यटन क्षेत्रातील करार प्रामुख्याने असणार आहे.सायंकाळी साडेसात वाजता येथील मराठी समुदायाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे शिष्ठमंडळ सहभागी होईल.त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होईल.

उद्या दुसऱ्या दिवशी मराठी समुदायांशी भेटी असा दोन दिवसीय दौरा असणार आहे. त्यानंतर फडणवीस मायदेशी परततील. मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याने या मराठी बांधवांच्या आनंदात भर पडली आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

मराठी समुदायाचा मोठा सहभाग 

या सर्वानी एकत्र येत १ मे १९६० रोजी मॉरिशस मराठी मंडळ, फेडरेशनची स्थापना केली.या फेडरेशन द्वारे महाराष्ट्र दिन, शिव जयंती, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी असे मराठमोळे सण उत्साहात येथे साजरे केले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा