एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी आणि कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्याशी संबंधित मोठ्या प्रमाणात सोन्याच्या तस्करीच्या तपासात तिच्या कार्यपद्धतीबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बेंगळुरू विमानतळावरून १२.५६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या बारसह अटक करण्यात आलेल्या रान्या रावने गेल्या वर्षभरात ३० वेळा दुबईला प्रवास केला असल्याचे समोर आले आहे.
डीआरआयने या प्रकरणात आतापर्यंत १७.२९ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. अभिनेत्रीला काल अटक केल्यानंतर पथकाने तिच्या घरावर धाड टाकली. यावेळी कारवाई तिच्याघरातून २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख जप्त केले.
हे ही वाचा :
देवभूमी उत्तराखंड अध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण
डीप-टेक इनोव्हेशन भारताला १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार
अमेरिकेतील घुसखोरांना मायदेशी पाठवण्याचा खर्च ३० लाख डॉलर्स, उड्डाणे स्थगित
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या!
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, आतापर्यंत तीन चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री रान्या राव हिने गेल्या वर्षभरात ३० वेळा दुबईला प्रवास केला आणि आरोप आहे कि प्रवासा दरम्यान मोठ्या प्रमाणात सोने परत आणले. विशेष म्हणजे, या सोन्याच्या तस्करी मागे, प्रत्येकी किलोमागे तिला १ लाख रुपये देण्यात आले होते. अशा प्रकारे, प्रत्येक ट्रिपमागे तिला १२ ते १३ लाख रुपये मिळायचे.
विमानतळ सुरक्षेपासून वाचण्यासाठी रावने सोन्याची तस्करी करण्यासाठी सुधारित जॅकेट आणि कमरेच्या पट्ट्यांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, अभिनेत्रीचे सावत्र वडील रामचंद्र राव हे कर्नाटकातील आयपीएस अधिकारी आहेत. या प्रकरणी अधिकाऱ्याने अभिनेत्रीच्या कृतीबद्दल स्वतःला दूर केले आणि सांगितले की ती तिच्या पतीसोबत वेगळी राहत होती. त्यामुळे याबाबत काही माहिती नाही.