27 C
Mumbai
Saturday, October 12, 2024
घरविशेषकाँग्रेसचे खोटे नरेटिव्ह राहुल गांधींमुळे पुरते स्पष्ट !

काँग्रेसचे खोटे नरेटिव्ह राहुल गांधींमुळे पुरते स्पष्ट !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते राहुल गांधीनी अमेरिकेत केलेल्या आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींच्या आरक्षणाच्या विधानावर बोट ठेवत टीका केली आहे. मतांसाठी कशा प्रकारे कॉंग्रेस खोटा नरेटिव्ह तयार करते हे राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  काँग्रेसचा खरा चेहरा हा त्यांच्या परदेशातील वक्तव्याने समोर आलेला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्यावर बोलले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट करायची, हे अतिशय चुकीच आहे.

हे ही वाचा :

राहुल गांधींच्या वक्तव्याने काँग्रेसचा चेहरा उघड !

हिंदूंबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या माजीद फ्रीमनला २२ आठवडे तुरुंगवासाची शिक्षा

खलिस्तानी नेता गुरुपतवंत पन्नू राहुल गांधींच्या पाठीशी !

मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या; कोण होते अनिल अरोरा?

संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीही सन्मान केला नाही, लोकसभेत त्यांना जाऊ दिले नाही, दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना काँग्रेसने पराभूत केले. मतांसाठी कशा प्रकारे कॉंग्रेस खोटा नरेटिव्ह तयार करते हे राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष आरक्षणाच्या बाजूने असून आरक्षण बंद करू दिले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा