बिहारच्या गयामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. धनबाद रेल्वे विभागातील बधुआ-तनकुप्पा स्थानकादरम्यान ही घटना घडली. दगडफेकीमुळे रेल्वेच्या डब्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. रेल्वे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशा घटनांमागे कोण आहेत, याची माहिती घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रायल ट्रेन टाटाहून गोमो मार्गे गयाच्या दिशेने येत असताना अज्ञातांकडून दगडफेक झाली. दगडफेकीमुळे वंदे भारत ट्रेनच्या डब्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. या प्रकरणी रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रायल ट्रेनवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोमो ते गया येथे ड्युटीवर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक ट्रेनमध्ये उपस्थित होते. काल (१० सप्टेंबर) रात्री ही घटना घडली. सध्या याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
राहुल गांधींच्या वक्तव्याने काँग्रेसचा चेहरा उघड !
हिंदूंबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या माजीद फ्रीमनला २२ आठवडे तुरुंगवासाची शिक्षा
मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या; कोण होते अनिल अरोरा?
खलिस्तानी नेता गुरुपतवंत पन्नू राहुल गांधींच्या पाठीशी !
दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे रेल्वे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या पाच वर्षांत दगडफेकीच्या जवळपास अशा ५० घटना घडल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. नुकताच गेल्या वर्षी रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२३ या कालावधीत केवळ दगडफेकीमुळे रेल्वेचे सुमारे ५६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दगडफेकीमुळे तुटलेल्या ट्रेनच्या काचा दुरुस्त करण्यासाठी दरवर्षी १५ लाख रुपये खर्च केले जातात.