भारताच्या समुद्री सुरक्षा आणि सामरिक क्षमतेला नवसंजीवनी मिळणार आहे, कारण कॅलिनिनग्राडमधून आलेली अत्याधुनिक स्टेल्थ मल्टी-रोल फ्रिगेट ‘तमाल’ १ जुलैपासून भारतीय नौदलात कमीशन होणार आहे. ‘तमाल’ हा रशियाकडून प्राप्त क्रिवाक क्लास फ्रिगेट्स मालिकेतील ८वा आणि तुशील क्लासमधील दुसरा युद्धनौका आहे.
हे जहाज तलवार व तेग या वर्गातील युद्धनौकांचा उन्नत अवतार म्हणून या जहाजाकडे पाहता येते.
‘मेक इन इंडिया’सह आत्मनिर्भर भारत
‘तमाल’ ही परदेशातून येणाऱ्या अंतिम युद्धनौकांपैकी एक असेल. त्यानंतर गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये रशियन तंत्रज्ञान व डिझाईनच्या सहयोगाने दोन फ्रिगेट्सचे बांधकाम भारतात सुरू आहे. हे ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पूरक ठरणार आहे.
‘तमाल’ची तांत्रिक क्षमता
-
ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईल: समुद्रावर आणि स्थलीय लक्ष्यांवर प्रहार करण्यास सक्षम.
-
वर्टिकल लॉन्च सिस्टम: हवाई हल्ले रोखण्यासाठी.
-
१०० मिमी आधुनिक नौदल तोफा, हेवीवेट टॉरपीडो, तेज आक्रमक अँटी-सबमरीन रॉकेट्स.
-
नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर व इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली.
-
३० नॉट्सपेक्षा अधिक गती व लांब समुद्री वाहतुकीसाठी सक्षम.
नाव आणि प्रतीक
-
‘तमाल’ हे नाव पौराणिकरित्या इंद्रदेवाच्या युद्धतलवारीपासून प्रेरित.
-
शुभांक: भारतीय पौराणिक जाम्भवन्त व रशियन यूरेशियन ब्राऊन बेअर यांच्या संगमातून.
-
क्रूला ओळख: ‘द ग्रेट बीअर’
-
घोषवाक्य: “सर्वदा सर्वत्र विजय” (प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी विजय).
प्रशिक्षण व चाचण्या
२५० पेक्षा अधिक नौदल जवानांनी सेंट पीटर्सबर्ग व कॅलिनिनग्राड येथे प्रशिक्षण घेतले. ‘तमाल’ने मागील तीन महिन्यांत तीव्र समुद्रपरिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
भारत-रशिया सामरिक भागीदारी
ही युद्धनौका भारत-रशियाच्या दीर्घकालीन संरक्षण सहयोगाचा मूर्त प्रत्यय. कमीशननंतर ‘तमाल’ भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्यात समाविष्ट होऊन समुद्री सीमांचे रक्षण अधिक बळकट करेल.
