26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरविशेषगलवानचा शूर कर्नल संतोष बाबू ठरला 'महावीर'

गलवानचा शूर कर्नल संतोष बाबू ठरला ‘महावीर’

Related

कर्नल बी संतोष बाबू , २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. त्याना मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मरणोत्तर देशातील द्वितिय शौर्य सन्मान म्हणजेच महावीर चक्र प्रदान करून गौरवित करण्यात आले. कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी व आईने हा बहुमान राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

१५ जून २०२० रोजी संख्येने अधिक असलेल्या चिनी सैन्याशी भारतीय जवानांनी प्राणपणाने झुंज दिली. संतोष बाबू यांच्यासमवेत लढणाऱ्या इतर पाच गलवान शूरांनाही वीरचक्र प्रदान केले; त्यापैकी चार जणांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यांना देण्यात आलेल्या मानपत्रात संतोष बाबू यांच्या शौर्याची गाथा लिहिली आहे. पदावर असताना त्यांना बऱ्याच अडचणींना सामना करावा लागला, कर्नल बाबू गंभीर जखमी असतानाही शत्रूंनी केलेला धारदार शस्त्रांचा प्राणघात हल्ला व दगडफेक याला प्रतिकार सुरुच ठेवला. झालेल्या चकमकीत ते शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय सैन्याला प्रेरणा देत राहिले. त्यांनी कसम परेडवेळी घेतलेली शपथ खरी करून दाखवली.

हे ही वाचा:

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच ते ५ हजारांची वाढ

‘स्वर्गीय सृष्टी सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ पुस्तकातून दिसतो पूर्व भारताचा नजारा

मंदिर तोडले कट्टरवाद्यांनी, दंड भरतोय हिंदू समाज

नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे गेले उच्च न्यायालयात

 

त्याचबरोबर गलवान चकमकीत झालेल्या हल्ल्यात नायब सुभेदार नुदुराम सोरेन (१६ बिहार), हवालदार के पालन (८१ फील्ड रेजिमेंट), नाईक दीपक सिंग ( आर्मी मेडिकल क्रॉप ) आणि सेपोय गुरतेज सिंग ( ३ पंजाब ) यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. हल्ल्यातील पाचवे वीरचक्र प्राप्त करणारे हवालदार तेजिंदर सिंग ( ३ मध्यम रेजिमेंट) हे एकमेव जिवंत प्राप्तकर्ते होते. हल्ल्यात २० भारतीय सैनिकांनी आपले प्राण दिले, परंतु चीनने फक्त बटालियन अधिकारी आणि इतर चार जण गमावल्याचे सांगितले तरीही त्यांच्या सैन्यची किती जीवितहानी झाली हे स्पष्ट केलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा