24 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरविशेष"आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना"

“आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना”

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत' कार्यक्रमाचा शुभारंभ

Google News Follow

Related

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ सप्टेंबर) मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईद्वारे आयोजित ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेसाठी कृतसंकल्पित झाला आहे.

आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना आहे. आपण सर्वांनी ऑपरेशन सिंदुरमध्ये भारताची ताकद बघितलेली आहे. भारताची ताकद आणि भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अशी आहे की, भारताला कोणी पराजित करू शकत नाही. पण एक गोष्ट भारताला पराजित करु शकते, ती म्हणजे ड्रग्स. त्यामुळे आपला युवा जर नशामुक्त असला, तर आपल्या भारतावर कुठलेही आक्रमण चालू शकणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

या नमो युवा रनची थीम नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई आहे. आपली तरुणाई देशभक्ती, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचे तसेच देशाला आत्मनिर्भर करण्याचा नशा करेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी याप्रसंगी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाचे आयोजक यांचे अभिनंदन करत, या उपक्रमात सहभागी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : 

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; पंतप्रधानांकडून अभिनंदन!

एकनाथ शिंदेंचं एक्स अकाउंट हॅक; पाक-तुर्की ध्वजांसह पोस्ट शेअर!

२६/११ च्या हल्ल्या आधी सुरु होता काँग्रेस – हाफीज सईदचा रोमान्स |

ब्रश केल्यावर लगेच चहा का पिऊ नये?

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ, अभिनेते मिलिंद सोमण व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा