25 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरविशेषजेष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड!

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड!

मराठी सिनेविश्वावर शोककळा

Google News Follow

Related

मराठी सिने सृष्टीतून दुखद बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. यानंतर कर्करोगातून बाहेरही पडले होते, पण पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागला आणि अखेर त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सतत हसवणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

अतुल परचुरे यांच्या निधनाने नाट्य रसिकांना देखील मोठा धक्का बसला आहे. अनेक मालिका, नाटके, मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत असताना ते बरे होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता. मात्र, पुन्हा आजाराची लागण होत असल्याने ते रुग्णालयात दाखल झाले होते,अन आज त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकासाठी त्यांचा जोरदार सराव देखील सुरु होता. या सगळ्यातच अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर आली.

अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेते जयवंत वाडकर यांनी दुःख व्यक्त केले. जयवंत वाडकर म्हणाले, बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत, ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाचा सराव सुरु असताना पाच दिवसांपूर्वी  थोडा त्रास होवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो पुन्हा बरा होवून येईल असे वाटले होते, तत्पूर्वी दुखाची बातमी समोर आली. माझ्यासोबत ९ वीमध्ये असल्यापासून त्याने काम करण्यास सुरुवात केली होती. ‘टिळक आणि आगरकर’ हे त्यांचे पहिले नाटक, माझेही तेच पहिले नाटक. एक सुंदर, उत्कृष्ट कलाकार आज गेला, असे जयवंत वाडकर यांनी म्हटले.

अभिनेते अशोक सराफ यांनी देखील दुःख व्यक्त करत म्हणाले, फार वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता सिनेसृष्टीने गमावला. एक छान मुलगा आणि नट होता, त्याचे जाणे सतत मनाला जाणवत राहील. खिचडी या चित्रपटात त्याने माझ्या बालपणाचा रोल केला होता, ते मी विसरू शकत नाही, असे अशोक सराफ म्हणाले.

हे ही वाचा : 

यूपी, आसाममध्ये मदरशांना कुलूप, महाराष्ट्रात टॉनिक! |

मंत्री अमित शाहांचा खोटा व्हिडीओ दाखवल्या प्रकरणी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यावर गुन्हा दाखल!

मूकबधिरांना आत्मनिर्भर करणाऱ्या ‘टीच’ संस्थेच्या अमन शर्मांना केशवसृष्टी पुरस्कार

बाबा सिद्दीकिंच्या हत्येवरून आप नेत्याचा फडणवीसांवर हल्ला, पण स्वतःच झाले ट्रोल!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा