33 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरविशेषज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन

ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन

Related

ज्येष्ठ नाटककार, लेखक, पत्रकार जयंत पवार यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री दोनच्या सुमारास पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारा दरम्यानच त्यांचे निधन झाले.

जयंत पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील लेखनविश्वात शोककळा पसरली आहे. जयंत पवार यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी संध्या नरे या देखील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका आहेत. दुपारी १२.३० च्या सुमारास बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशान भूमीत पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जयंत पवार यांनी महाराष्ट्रातील लेखन क्षेत्रात आपल्या लेखणीच्या जोरावर स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले होते. जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत जयंत पवार यांना सर्वोत्तम लेखनाचे प्रथम पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले होते. कालांतराने ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर देखील आले.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ट्रॅकवर त्याने ठेवले दगड !

संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत

२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली

धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

२०१४ साली महाड येथे झालेल्या पंधराव्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे जयंत पवार हे अध्यक्ष होते. तर पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. गेला काही काळ त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते.

जयंत पवार यांचे गाजलेले लेखन
काय डेंजर वारा सुटलाय, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, अंधातर, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, दरवेशी, पाऊलखुणा, बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक, माझे घर, वंश, शेवटच्या बीभस्ताचे गाणे, होड्या

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा