28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरक्राईमनामा...म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोरच घेतले पेटवून

…म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोरच घेतले पेटवून

Related

प्रियकर असलेली व्यक्ती नात्याने आपला मामा लागतो हे कळताच प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोरच स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना मुंबईतील सात रस्ता येथे घडली. या जाळपोळीत ही तरुणी गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जखमी तरुणी ही २१ वर्षाची असून खारदांडा सांताक्रूझ येथे राहण्यास आहे. ३ वर्षांपूर्वी या तरुणीची गुजरात राज्यातील वडोदरा येथे एका लग्नसमारंभात तरुणाची ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेऊन लग्न करायचे ठरले होते. यासाठी दोघांनी आपापल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत सांगितले.

मात्र दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांच्या कुटुंबाची माहिती काढली असता तरुणी ज्याच्या प्रेमात पडली तो नात्याने तिचा मामा लागतो असे कळले. दोन्ही कुटुंबानी एकत्र येऊन ही सोयरीक मोडून काढली होती. मात्र या तरुणीला ते मान्य नव्हते. या तरुणीचा प्रियकर हा सात रस्ता महालक्ष्मी येथे राहण्यास असून त्याचे लग्न जुळले असल्याचे मैत्रीणकडून कळले.

या दरम्यान या तरुणीने शुक्रवारी सायंकाळी तडक प्रियकराचे घर गाठले, घरात लग्नाची तयारी सुरू असताना या तरुणीने प्रियकराच्या घरासमोरच सोबत आणलेले रॉकेल स्वतःवर ओतून पेटवून घेतले. स्थानिकांनी आग विझवून तरुणीला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले.

हे ही वाचा:

दाऊद टोळीतील गँगस्टर फहीम मचमच मृत्युमुखी

रेल्वेच्या ट्रॅकवर त्याने ठेवले दगड !

धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

अनिल परब…जरा स्वतःच्या खात्याकडे लक्ष द्या

तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली असून या घटनेची नोंद करण्यात आली असून जखमी अवस्थेत या तरुणीचा जबाब घेण्यात आला असल्याचे पोलिसनी सांगितले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा