28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषधुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

Google News Follow

Related

इंग्लंड क्रिकेट संघाने लीड्समधील लॉर्ड्सवरील पराभवाचा बदला घेतला आहे. हेडिंग्ले लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ ७८ धावा करता आल्या. यानंतर इंग्लंडने त्यांच्या फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या डावात ४३२ धावा केल्यावर ३५४ धावांची मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल तिसऱ्या दिवशी झुंज देणाऱ्या टीम इंडियाने चौथ्या दिवशी शस्त्रे म्यान केली. संपूर्ण संघ अवघ्या २७८ धावांवर बाद झाला. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

अशा प्रकारे इंग्लंडने तिसरी कसोटी एक डाव आणि ७६ धावांनी जिंकली. इंग्लंडच्या या विजयाचा नायक वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन होता. त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. याशिवाय क्रेग ओव्हरटनने दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात फक्त दोन विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याने रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत सारख्या मोठ्या फलंदाजांची विकेट घेतली. चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी रॉबिन्सनच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. रॉबिन्सनने सहा षटकांसह २६ षटकांत ६५ धावा देऊन पाच बळी घेतले.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदकापासून भारत एक पाऊल दूर

काय आहे मोदी सरकारने आणलेली भारत सिरीज?

पानिपत होण्याच्या भीतीनेच ठाकरे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे

रोनाल्डोची घरपावसी

तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दोन गड्यांज्या बदल्यात २१५ धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजारा ९१ धावांवर आणि कर्णधार विराट कोहली ४५ धावांवर नाबाद परतला. पण चौथ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी नव्या चेंडूने कहर केला. इंग्लिश गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेतल्या. चौथ्या दिवशी भारतीय संघाने अवघ्या ६३ धावांमध्ये आपले आठ गडी गमावले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा