29.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषअभ्युदय वात्सल्यमच्या वूमेन्स अचीव्हर्स पुरस्काराने शीतल कारुळकर यांचा सन्मान

अभ्युदय वात्सल्यमच्या वूमेन्स अचीव्हर्स पुरस्काराने शीतल कारुळकर यांचा सन्मान

Google News Follow

Related

अभ्युदय वात्सल्यम पत्रिकाच्या वतीने वूमेन अचीव्हर्स पुरस्काराचे वितरण नुकतेच आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे करण्यात आले. त्यात कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या शीतल कारुळकर यांना सन्मानित करण्यात आले.

यूपीएल लि.चे चेअरमन पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिरानंदानी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, एचडीएफसी म्युच्युअल फंडचे एमडी नवनीत मुनोत, एसयूडी लाइफ इन्शुरन्सचे एमडी अभय तिवारी, आर्कफिन ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रशांत कारुळकर, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्सचे एमडी शरद माथूर, एल अँड टी फायनान्स होल्डिंग लि.चे चेअरमन शैलेश हरीभक्ती, सनफ्रानचे एमडी संतोष मिश्रा यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कारुळकर प्रतिष्ठानची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतानाच शीतल कारुळकर यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. शीतल कारुळकर यांनी ग्रामीण भागात, आदिवासी पाड्यांमध्ये सामाजिक कार्य केले आहे. पर्यावरण संरक्षण, मुलांना शिक्षणासाठी मदत आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी भरपूर परिश्रमही घेतले आहेत. त्यांच्या या वाटचालीची दखल घेऊन अभ्युदय वात्सल्यमने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले.

हे ही वाचा:

गुणरत्न सदावर्तेंना अटक

मुंबई गुन्हे शाखेकडून ५ कोटी ८० लाखांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदला ३१ वर्षांचा तुरुंगवास

सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स

 

शीतल कारुळकर यांच्यासह विविध क्षेत्रात अग्रणी असलेल्या १४ महिलांना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. त्यात अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रिती अदानी, राज्यमंत्री आदिती तटकरे, एमपॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीरजा बिर्ला, मेट्रोपोलिस लॅबच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शहा, एडलगिव्ह फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्या शहा, – प्रतिष्ठित शास्त्रीय गायक पद्मश्री डॉ. सोमा घोष, भावना दोशी असोसिएट्स एलएलपी च्या संस्थापक भागीदार भावना दोशी, निष्णात वकील अॅड. आभा सिंग,  मुख्य कार्यकारी अधिकारी द अकॅडमी स्कूल डॉ. मैथिली तांबे, कायनेटिक ग्रीन एनर्जीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया, ब्लूमबर्ग क्विंट येथे व्यवस्थापकीय संपादक, मेनका दोशी,  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आयएएस निधी चौधरी, आरव ग्लोबल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रीना तिवारी यांचा समावेश होता.

अभ्युदय वात्सल्यमचे संस्थापक कृपाशंकर तिवारी यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचा मुद्दा उपस्थित केला तर अभ्युदय वात्सल्यमचे प्रमुख संपादक आलोक रंजन तिवारी यांनीही महिलांची प्रत्येक क्षेत्रात होत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे, असे म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा