बिहार निवडणुका जवळ येत असताना, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी पोस्ट केलेल्या त्याच छायाचित्राचा वापर करून छठपूजेच्या शुभेच्छा सोशल मीडियावर शेअर केल्या. या कृतीवरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जर तुम्हाला श्रद्धा समजत नसेल, तर कोलंबियाला परत जा आणि तुमचे सुट्ट्या साजऱ्या करण्याचे आवाहन भाजपा नेते अमित मालवीय यांनी केले आहे.
एक्सवर पोस्टकरत ते म्हणाले, जर तुम्हाला बिहार आणि त्याच्या सणांबद्दल थोडीशीही आपुलकी नसेल – मनापासून शुभेच्छा देण्याइतपतही नाही तर निवडणुका कशासाठी लढवायच्या?. छठसारखा पवित्र सण श्रद्धा, परंपरा आणि रंगांच्या विविधतेने भरलेला असतो, तरीही तुम्ही जुन्या पोस्ट महिन्यांनी फक्त दिखाव्यासाठी पुन्हा पोस्ट करता.
तुम्हाला बिहारचे लोक घाणेरडे दिसतात, त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येते, तरीही तुम्ही नाईलाजाने हस्तांदोलन करता. त्यांचे सण तुम्हाला उत्तेजित करत नाहीत, परंतु तुम्ही राजकीय नाईलाजाने त्यांचे अभिनंदन करता. ही तुमची महानता नाही, तो नाईलाज आहे.
बिहारचा अपमान करणे थांबवा, आणि जर तुम्हाला श्रद्धा समजत नसेल, तर कोलंबियाला परत जा आणि तुमच्या सुट्ट्या साजऱ्या करा. बिहार आता राजद-काँग्रेसला मतदान करणार नाही, असे मालवीय यांनी म्हटले.
हे ही वाचा :
सी. पी. राधाकृष्णन यांची सेशेल्सच्या राष्ट्राध्यक्षांशी भेट
इंदूरहून धार्मिक पर्यटनासाठी धावणार ‘भारत गौरव’ रेल्वे
‘अस्लम’ कृपेने मुंबईत वसवला जातोय ढाका…
भारताला मोठा धक्का! महिला विश्वकप उपांत्य फेरीतून प्रतिका रावल बाहेर







