29 C
Mumbai
Sunday, November 9, 2025
घरसंपादकीय'अस्लम' कृपेने मुंबईत वसवला जातोय ढाका...

‘अस्लम’ कृपेने मुंबईत वसवला जातोय ढाका…

इथली डेमॉग्रफी बदलल्यामुळे होरपळणारी अनेक हिंदू कुटुंबे इथे आहेत

Google News Follow

Related

बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार ऐकून तुम्ही सुन्न होताय, तुमचे रक्त खवळते आहे, तम्हाला भयंकर मानसिक त्रास होतोय, होत असेल तर तुमच्या माहितीसाठी मुंबईचा ढाका बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. रोज नव्या झोपड्या वसवल्या जातायत. बांगलादेशीं-रोहिंगे इथे वस्त्या थाटतायत. स्थानिक आदीवासींनी हुसकावून लावले जाते आहे. सहन करणारे सहन करतायत, लढणारे लढतायत. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी पैसे खाऊन मस्त आहेत.

मालवणीत अलिकडेच पालकमंत्री महोदय मंगलप्रभात लोढा यांचा अलिकडेच झालेला जनता दरबार गाजला. बोरीवलीचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी आमदाराची खरडपट्टी काढली. ६ ऑक्टोबर रोजी रात्री मालवणीतील प्रवीण राजपूत परीवारावर एका जमाल आणि इजहार मलिक या दोन मुस्लीम गुंडानी हल्ला केला. सोबत त्यांचे पाच-सहा जणांचे टोळके होते. राजपूत यांच्या घरातील दोन तरुण मुली आणि ७० वर्षाची म्हातारी या हल्ल्यातून सुटली नाही. ज्याने हत्याराने वार केले, तो जमाल एका खासगी नर्सिंगहोम मध्ये एडमिट झाला.

पोलिसांनी त्याला दहा दिवस हात लावला नाही. पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय यांच्या दबावानंतर जमालला अटक कऱण्यात आली. त्याचा भाऊ इजहार हा मात्र पोलिसांना सापडत नाही.

प्रवीण कांबळे हा अधिकारी हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत पडलेल्या प्रवीण राजपूत यांचा जबाब नोंदवायला गेला. त्याने दाखल केलेल्या पहिल्या एफआयआरमध्ये गंभीर जखमांचा उल्लेख नव्हता. आरोपीला तात्काळ जामीन मिळेल इतका सौम्य एफआयआर होता. डीसीपी संदीप जाधव यांनी खडसावल्यानंतर दुसऱ्या एफआयआरमध्ये ही चूक सुधारण्यात आली. २००१ मध्ये राजपूत परिवार म्हाडाच्या रिद्धीसिद्धी या इमारतीत राहायला आले. तेव्हा या इमारतीत ३५ पैकी फक्त दोन घरे मुस्लीमांची होती. आज ती फक्त २ राहिलेली आहेत. ही दोन कुटुंबे इथून चालती व्हावीत म्हणून त्यांच्यावर हे दहशतीचे प्रयोग सुरू आहेत.

मालवणी पोलिस ठाण्यात नगरकर नावाचे अत्यंत कार्यक्षम वरीष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. असे हल्ले वगैरे झाल्यानंतर त्यांची मन:शांती ढळत नाहीत. हल्लेखोरांना त्रास देण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. आपण बरे आणली आपले हफ्ते बरे असा त्यांचा हिशोब असतो. त्यांनी राजपूत हल्ला प्रकरणी फार काही करण्याचे कष्ट घेतले नाहीत.

हे ही वाचा:

कृषी संस्थांमधील रिक्त पदे भरणार

टी२० मध्ये भारताचा दबदबा!

देशातील १२ राज्यात एसआयआर करणार, महाराष्ट्रात मात्र नाही

पृथ्वी शॉने फटकावले फक्त १४१ चेंडूत दुहेरी शतक!

मालवणीत हे रोजचे आहे. या क्षेत्रात शांतता निर्माण करण्यासाठी पोलिसांनी एक जबरदस्त तंत्र विकसित केलेले आहे. कोणावर हल्ला झाला, विनयभंग झाला की पोलिस आरोपीवर पोलिस एफआयआर दाखल करत नाही. तक्रारदाराने फार आग्रह धरला की, ‘आरोपीने तुमच्याविरुद्धही तक्रार केलेली आहे. तुमच्यावर सुद्धा क्रॉस एफआयआऱ घ्यावा लागेल’ असा दम देतात. ९० टक्के वेळा पोलिसांना याचा फायदा होतो. मामला रफा दफा होतो. आरोपीकडून व्यवस्थित तोडपाणी होते. पुन्हा पोलिसांच्या डोक्याला आरोपीला शोधा, त्याच्यावर कारवाई करा, हा ताप नाही.

हे घडतेय कारण मालवणीच्या लोकसंख्येचे गणित बदलण्याचे काम अत्यंत शांतपणे सुरू आहे. अनेक आदिवासी वस्त्यांवर अतिक्रमण झालेले आहे. तिवरांची वने तोडून झोपड्या वसवण्यात आलेल्या आहेत. इथे पर्यावरणवाले येत नाही. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी चिरीमिरी घेऊन बाजूला होतात. इतकी अतिक्रमणे झाली नव्या झोपड्या रोज उभ्या राहतायत. परंतु स्थानिक आमदार अस्लम शेख यांची एकही तक्रार नाही. कारण झोपड्या वसवणारे त्यांचेचे लोक आहेत. सरकारी जमिनी गिळल्या जातायत. संरक्षण मंत्रालयाच्या जमीनींवर अतिक्रमण होते आहे. तिवरांची व्यवस्थित साफसफाई सुरू आहे.

मालवणीत धारीवली नावाची आदिवासी वस्ती होती. आजूबाजूला तिवरांची झाडे होती. इथे एक मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे. मूठभर आदिवासींना इथून हुसकावले जात आहे. हा बांगलादेशी-रोहिंग्यांचा नवा अड्डा बनला आहे. मालवणी गेट क्रमांक ६ येथे सिटी सर्वे नंबर २६७० ही सरकारी जागा आहे. इथे २०१९ पासून झोपड्या उभारण्याची सुरूवात झाली. सुल्तान मिया सरदार आणि राहील शेख या दोन झोपडपट्टी माफियांनी इथे हजार झोपड्या उभारल्या आहेत. साडेतीन एकर जमीन घशात घातली आहे. मालवणी चर्च समोर असेच एक साईकृपा नगर वसवण्यात आले आहे. अंबोज वाडीची कथाही अशीच.

इथे झोपडपट्टी थाटणारे स्थानिक माफिया आहेत. पण इथे राहणारे लोक कुठून येतात. त्यांना इथपर्यंत कोण घेऊन येते. त्यांना पाण्याच्या जोडण्या, वीजेची व्यवस्था कोणी केली असा प्रश्न कोणाला पडू नये. स्थानिक आमदार अत्यंत मानवतावादी आहेत. बांगलादेशी, रोहिंगे कोणीही असले तरी ते मानवतावाद बाजूला ठेवून मदत करीत असतात. मालवणीत अस्लम शेख आमदार झाल्यापासून किती सरकारी जमिनीवर, पालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण झाले याची माहिती सरकारने घेतली, तर त्यांचे हृदय किती विशाल आहे, हे मुंबईकरांच्या समोर येऊ शकेल. माजी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे वजन आहेच. मालवणीतील तिवरे तोडून त्यांनी इथे मोठे मोठे अनधिकृत स्टुडियो उभारले आहेत. त्यांचा बंगलाही अनधिकृत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवला होता.

मालवणी अशी ओरबाडली जात असताना संजय उपाध्याय यांच्यासारखे लोक लढतायत. कारण त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य ठाऊक आहे. ही वाळवी किती घातक आहे, याची त्यांना जाण आहे. उपाध्याय आमदार झाल्यापासून त्यांनी बोरिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट बंद केला. बोरीवलीतील अनधिकृत फेरीवाले हे स्थानिक नाहीत. ते मुंब्रा, मालवणीतून इथे येतात आणि फूटपाथवर अतिक्रमण करतात. स्थानिक फेरीवाल्यांना हुसकावून लावतात. उपाध्याय यांच्या या कारवाईमुळे बोरीवलीकरांनी मोकळा श्वास घेतलेला आहे.

पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या जनता दरबारमध्ये प्रवीण राजपूत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विषय बोरीवलीचे आमदार असलेले संजय उपाध्याय उपस्थित करतात. इथे भाजपाच्या तिकीटावर विनोद शेलार यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. राजपूत कुटुंबियांसाठी आवाज उठवण्याची जबाबदारी त्यांची होती. इथली डेमॉग्रफी बदलल्यामुळे होरपळणारी अनेक हिंदू कुटुंबे इथे आहेत. विनोद शेलार हे खूप मोठे नेते असल्यामुळे या हिंदू कुटुंबांचा आवाज शेलार यांच्या पर्यंत पोहोचत नाही. त्यांना इथे वसवण्यात येणाऱ्या झोपड्याही दिसत नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा