बकरी ईदला करण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीवरून विश्व हिंदू परिषदेने सरकारला गोवंश हत्या थांबवण्याची विनंती केली. बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाऊ नये तसेच गोवंश हत्या थांबवा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे. तर बकरी ईदला गायींची कत्तल होणार नाही, असे आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तर हिंदू सण पर्यावरण पूरक साजरे करा असे सल्ले देणारे बकरी ईद व्हर्चुअली का साजरी केली जात नाही, असा संतप्त सवाल भाजपा मंत्री नितेश राणे यांनी विचारला आहे.
प्रांत मंत्री गोविंद शेंडे म्हणाले, बकरी ईदच्या नावाने लाखो बकरे-बकरी कापलेच जातील. यासोबत अन्य प्राणी देखील कापले जातात, ज्यामध्ये गाय, बैल यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशमध्ये असताना नागपूर जवळ सिवनी म्हणून आहे, तिथे उंट कापून टाकला होता. त्यामुळे बकरी ईद करता कि उंट ईद करता?, हा एक सवाल आहे आणि हे सर्व बंद झाले पाहिजे.
हे ही वाचा :
सीडीएस जे काही म्हणाले, ते आधीही सांगण्यात आले होते…
…आणि अशा पद्धतीने रशियन विमानांना बेमालुमपणे युक्रेनने उद्ध्वस्त केले!
१६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, ‘हे’ गाव झाले नक्षलमुक्त!
प्राण्यांच्या बाजार बंद करण्याचा निर्णय गाईंच्या संरक्षणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पोलीस कमिशनर आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून अमरावतीत बकरी ईदला गाईची कत्तल होणार नाही याचे आश्वासन देतो. भाजपा मंत्री नितेश राणे म्हणाले, कुठलेही हिंदू सण आले, उदाहरणार्थ जेव्हा होळी येते तेव्हा रंग वापरू नका, पर्यावरणाची खूप काळजी घ्या, असे सल्ले देणारे खूप कारटे कुठे ना कुठेतरी आम्हाला मिळतात. दिवाळीला देखील फटाके फोडण्यावरून आम्हाला सल्ले दिले जातात. त्यामुळे आता जी बकरी ईद साजरी होणार आहे ती पर्यावरण पूरक असावी, व्हर्चुअली साजरी करावी असे कोणी का बोलत नाहीये.
