29 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरविशेषअंधेरीच्या गोखले पुलामुळे मेट्रो १मध्ये वाढले प्रवासी

अंधेरीच्या गोखले पुलामुळे मेट्रो १मध्ये वाढले प्रवासी

वाढत्या प्रवाशांचा ताण आता मेट्रोवर

Google News Follow

Related

अंधेरी पूर्व व पश्चिम जोडणारा गोखले पूल महापालिकेने डागडुजीसाठी २ वर्ष बंद केला आहे. त्यामुळे पश्चिमेकडे जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. परिणामी वाहन चालकांना उलट २ किमीचा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे एरव्ही रस्त्याने अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱ्यांनी आता मेट्रो १ म्हणजेच घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचा आधार घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.

अंधेरीचा गोखले पूल बंद केल्यामुळे मेट्रो १ वर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. यामुळे अवघ्या मागच्या दोन दिवसात प्रवासी संख्या २८ हजारांनी वाढली आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण आल्याने अतिरिक्त सुरक्षारक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सोमवारी ११ हजार प्रवाशांची वाढ झाली असून, मंगळवारी हीच वाढ १७ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही वाढ २५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याच प्रमाणे अंधेरी आधीच्या साकीनाका, असल्फा या भागातून डीएननगर व आझाद नगरदरम्यान प्रवास करणाऱ्यां प्रवाशांचा आकडा ही सर्वाधिक असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पूर्वी प्रवासी मेट्रो रेल्वे ऐवजी लोकल ट्रेनने दादरला जावून अंधेरीला जात असे, आता मात्र गोखले पूल बंद केल्या पासून प्रवासी घाटकोपर ते अंधेरी असा प्रवास करतात, त्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त प्रवाशांचा ताण वाढू लागला आहे.

हे ही वाचा:

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

गोखले पूल दोन वर्षासाठी बंद केल्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी घाटकोपर मेट्रो रेल्वे स्थानकांवर एकूण ११ तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर एरव्ही दुपारी कमी गर्दीच्या वेळी केवळ चार खिडक्यांवर प्रवाशांसाठी तिकीट उपलब्ध होत असे ते आता मात्र ७ खिडक्या टिकितीसाठी उघडण्यात आल्या आहेत. तसेच यामुळे प्रवाशांचा ताण वाढल्यामुळे संकट टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षारक्षक ही तैनात करण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा