28 C
Mumbai
Saturday, July 24, 2021
घरविशेषमुंबईत एसटी बंद; लोकांच्या त्रासात भर

मुंबईत एसटी बंद; लोकांच्या त्रासात भर

Related

कोविडकाळामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास बंद करण्यात आला होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस मुंबईच्या रस्त्यावरून धावत होत्या. मात्र या बसेसची सेवा १४ जून पासून बंद करण्यात येणार असल्याचे घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे मात्र हाल होणार आहेत.

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या कठीण काळातही अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवली. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासून एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडलं. सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी झाली आहे. या लाटेदरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे उपनगरी लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद ठेवल्या गेल्या. बेस्ट व्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या काही गाड्याही मुंबईत धावत होत्या. पण ही सेवा १४ जूनपासून निलंबित केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

हे ही वाचा:

१२ वर्षानंतर नेतान्याहू सत्तेतून बाहेर

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

विधानसभा निवडणूकही काँग्रेसने स्वबळावर लढवावी

मुंबईतील इमारत कोसळण्याच्या घटनांसाठी अग्निशमन दलाला ३ हजार कॉल

लॉकडाऊनमुळे लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर होऊ नये यासाठी मुंबईत बेस्टसह एसटी बसेसही धावत होत्या. पण सोमवारपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. एका बाजूला सरकार हळूहळू काही दुकाने व इतर काही आस्थापनांना परवानगी देत आहे, त्यामुळे नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यात आता अतिरिक्त एस टी बसेस देखील धावणार नाहीतय. यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आज मुंबईत ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. बस स्थानकांवर लांबच लांब रांगा लागल्या आहे. तर चाकरमान्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच सरकारी कर्मचारी वगळता कोणालाही सार्वजनिक प्रवास करण्याची परवानगी नाही. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या अतिरिक्त गाड्याही १४ जूनपासून बंद ठेवण्यात आल्या असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,289अनुयायीअनुकरण करा
1,970सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा