31 C
Mumbai
Saturday, October 1, 2022
घरविशेषपेगॅसससारखे कोणतेही स्पायवेअर वापरात नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

पेगॅसससारखे कोणतेही स्पायवेअर वापरात नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

न्यायालय नियुक्त समितीच्या अहवालावरून काढला निष्कर्ष

Related

ज्या पेगॅससवरून विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता चित्र पुरते स्पष्ट झाले आहे. भारत सरकार पेगॅसस नावाचे स्पायवेअर वापरत होते, असा कोणताही पुरावा आढळला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.

ज्या २९ फोनची तपासणी करण्यात आली त्यात इस्रायलचे हे स्पायवेअर आढळले नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडून काढण्यात आला आहे, असे मुख्य न्यायमूर्ती रमणा यांनी म्हटले आहे. एन.व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत, न्या. हिमा कोहली यांच्या पीठाने म्हटले की, २९ मोबाईल फोनची तपासणी केल्यावर त्यातील ५ फोनमध्ये मालवेअर आढळले पण ते पेगॅसस नाही.

हे ही वाचा:

देशसेवेचा निर्धारू राजगुरू !

रविशकुमार अब बाथरुमसे पत्रकारिता करेंगे ?

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे; कारण

बीडीडी चाळीतील पाेलिसांना मिळणार १५ लाखांत घर

 

न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांनी आपला अहवाल जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केला. इतर सदस्यांमध्ये आलोक जोशी, सुंदी ओबेरॉय यांचाही समावेश होता.

न्यायालयाने असेही म्हटले की, या चौकशी प्रक्रियेत सरकारची कोणतीही मदत या समितीने घेतलेली नाही. आता हा खटला चार आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आला असून हा अहवाल वेबसाईटवर सर्वोच्च न्यायालयाकडून अपलोड केला जाण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिबल आणि वृंजा ग्रोव्हर यांनी हा अहवाल हवा असल्याचे सांगितल्यावर तो अपलोड केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पण सिबल यांनी आम्हाला केवळ कोणते मालवेअर या मोबाईल फोनमध्ये सापडले त्याची माहिती मिळावी एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा