इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान कार्यकर्ता सलवान मोमिका याने कुराणावर पाय ठेवून इस्रायली ध्वज फडकावले आणि ध्वजाचे चुंबन घेत ज्यू राष्ट्रासोबत एकता व्यक्त केली.या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.ही घटना स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये शनिवारी (२१ ऑक्टोबर) घडली.या व्हिडिओमध्ये स्वीडनमध्ये राहणारा इराकी निर्वासित सलवान मोमिका हा इस्रायली ध्वजाचे चुंबन घेत कुराणाची प्रत पायाने तुडवताना दिसत आहे.
सलवान मोमिका याने शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी ट्विट करत याची घोषणा केली होती.मोमिका याने ट्विटमध्ये म्हटले होते की, उद्या मी इस्रायल देशाचा ध्वज फडकवणार आहे, इस्रायलशी एकता जाहीर करेन आणि स्टॉकहोममध्ये कुराण आणि पॅलेस्टिनी ध्वज जाळेन, असे ट्विट त्याने केले होते.त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सलवान मोमिका याने कुराणावर पाय ठेवून इस्रायली ध्वज फडकावले.
हे ही वाचा:
पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!
आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!
स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीबाहेर झालेल्या निदर्शनानंतर स्वीडिश पोलिसांनी या वर्षीच्या २८ जून रोजी इराकी निर्वासितांना कुराण जाळण्याची परवानगी दिली.
मात्र या कृत्यामुळे परिणामी, येमेनमधील हुथी चळवळीने स्वीडनमधून आयातीवर बंदी घातली.या प्रकरणी हौथी व्यापार मंत्री अल मसिराह म्हणाले की, मुस्लिमांच्या पवित्र ग्रंथाचे उल्लंघन केल्यामुळे येमेन कडून स्वीडिश वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.येमेन हा पहिला इस्लामिक देश आहे ज्याने स्वीडिश वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे, असे ते म्हणाले.तसेच इतर इस्लामिक राष्ट्रांना स्कॅन्डिनेव्हियन देशातून आयातीवर बंदी घालण्याचे आवाहन त्यांनी केले.