25 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरविशेषहिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटातून माघार घेणारे तनवाणी शिंदे गटात 

हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटातून माघार घेणारे तनवाणी शिंदे गटात 

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Google News Follow

Related

संभाजीनगर मध्य भागातून हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळालेली उमेदवारी परत करणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनी आज (१४ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. २९ ऑक्टोबरला अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी माघार घेतली होती. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.

उमेदवारी मागे घेण्यापूर्वी पत्रकार परिषदेत किशनचंद तनवाणी यांनी सांगितले की,  २०१४ मध्ये इथे जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आपण हा निर्णय घेतला. त्यावेळी भाजपाकडून आपण उमेदवार होतो आणि शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल उमेदवार होते. शिवाय एमआयएमचे इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण तेव्हा दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडल्याने जलील निवडून आले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

दलवाई म्हणतात, आरएसएस दहशतवादी, भाजपने मारले जोडे!

गुजराती मराठी भांडण लावून नरेटिव्ह सेट करण्याचा संजय राऊत, रोहित पवारांचा प्रयत्न?

मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?

बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय!

दरम्यान, किशनचंद तनवाणी यांनी अचानक माघार घेतल्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला होता. या निर्णयामुळे मतदारसंघाचा उमेदवार बदलण्याची नामुष्की उबाठावर आली होती. दरम्यान, तनवाणी यांनी उबाठा गटाच्या सदस्याचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा होती. या चर्चेवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. तनवाणी आणि त्यांच्या कार्यकत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा