28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषलोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?

लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?

Related

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच शाळा, मंदिरे आणि सिनेमा, नाट्यगृहे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. या पाठोपाठच आता महाविद्यालयेही सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वच पूर्वपदावर येत असताना रेल्वे प्रवासासाठी असलेले निर्बंध लक्षात घेता शिक्षक, इतर कर्मचारी, सिनेमा, नाट्य क्षेत्रातील कर्मचारी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी लोकल प्रवास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लसीकरणाच्या १४ दिवसानंतर रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, ज्यांचे लसीचे दोन डोस झालेले नाहीत त्यांच्या प्रवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण सुरू झालेले नाही त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा, महाविद्यालयापासून मुकावे लागेल का, अशी समस्या उभी ठाकली आहे.

हे ही वाचा:

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

लसीकरणा अभावी शिक्षक व विद्यार्थ्यांना सरसकट लोकल प्रवासासह शाळा, महाविद्यालयाला मुकावे लागणार आहे, असे भाजप शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढोले यांनी अनेक विद्यार्थी कोरोना काळात शिक्षणाला मुकले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणायासाठी शाळा सुरू करणे गरजेचे होते, असे मत मांडले आहे.

राज्य सरकारकडून ज्या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची सूचना दिली जाईल, तेव्हा त्यांना रेल्वे प्रवासाला परवानगी दिली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. शुक्रवारी (२४ सप्टेंबर) राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा तर, ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवारी (२५ सप्टेंबर) घेतलेल्या निर्णयानुसार २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे खुली होणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा