28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषटी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच!

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच!

Google News Follow

Related

टी-२० विश्वचषकाची रणधुमाळी १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला जाणार आहे. १ मेपर्यंत सर्व संघांना आपापले संघ जाहीर करायचे आहेत. अशा तऱ्हेने विश्वचषकात भारतीय संघामध्ये कोणकोणत्या खेळाडूंची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर लवकरच १५ खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी बैठक घेणार आहेत. त्यानंतर विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल.

२७ किंवा २८ एप्रिल रोजी दिल्लीत बैठक
निवड समिती २७ किंवा २८ एप्रिल रोजी दिल्लीत बैठक घेऊ शकतात. २७ एप्रिलला अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना आहे. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही दिल्लीत उपस्थित राहणार आहे. रोहित शर्मा आणि सर्व निवड समिती टी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी संघाच्या निवडीला मंजुरी देऊ शकतात. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सध्या स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून २७ किंवा २८ एप्रिल रोजी ते या बैठकीसाठी थेट दिल्लीला येणार आहेत.

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज विश्वचषकासाठी अमेरिकेला जाणार हे जवळपास निश्चित आहे. जर हे सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर ते विश्वचषकात नक्कीच खेळतील. दरम्यान, हार्दिक पांड्या अडचणीत येताना दिसत आहे.

हेही वाचा :

एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील!

मध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

दूरदर्शनचा लोगो आता केशरी रंगात

उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून खोटे बोलत होते, हे सिद्ध झाले!

भारत पहिला सामना कधी खेळणार?
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये २० संघ सहभागी होणार आहेत. जे ५-५ संघांच्या ४ गटांमध्ये विभागले गेले आहेत. भारतीय संघाला अ गटात स्थान मिळाले असून त्यात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंडचा समावेश आहे. भारतीय संघ ५ जूनपासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. जिथे त्यांचा सामना आयर्लंडशी होईल. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ जून रोजी सामना रंगणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा