गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथील एका तरुणाला दहशतवादी संबंधांच्या संशयावरून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत, जे सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ निष्क्रिय केले. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचण्यात येत होता.
अटक केलेल्या तरुणाचे नाव अब्दुल रहमान (१९) असे आहे, तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील रहिवासी आहे. हरियाणा पोलिस आणि केंद्रीय एजन्सींकडून त्याची सखोल चौकशी केली जात आहे, तर त्याचे मोबाईल फोन आणि इतर जप्त केलेल्या साहित्याची देखील तपासणी केली जात आहे. त्याच्याकडून अनेक संशयास्पद व्हिडिओ देखील सापडले आहेत, ज्यात देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान गेल्या अनेक दिवसांपासून बनावट ओळखपत्रासह फरीदाबादच्या पाली गावात राहत होता. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा दलांनी त्याला लगेचच पकडले.
हे ही वाचा :
आयआयटी बाबा अभय सिंहकडे सापडले गांजाचे पाकीट!
अलाहाबादियाला पश्चात्ताप होईल अशी आशा व्यक्त करत पॉडकास्ट सुरू करण्यास परवानगी!
अबू आझमी यांना औरंग्याचा पुळका, म्हणाले चांगला प्रशासक होता!
फरिदाबाद एसटीएफच्या सहकार्याने गुजरात एटीएसने ही कारवाई केली. अब्दुल रहमान कोणाच्या संपर्कात होता आणि त्याचे हेतू काय होते हे तपास यंत्रणा आता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. चौकशीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरक्षा एजन्सींमधील सूत्रांनुसार, अब्दुल रहमान हा आयएसआयच्या आयएसकेपी (इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत) मॉड्यूलशी संबधित असू शकतो. त्याच्याशिवाय या नेटवर्कमध्ये इतर लोकही सामील असण्याची भीती आहे, ज्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.