महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्धी मिळालेल्या आयआयटी बाबा अभय सिंह यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयआयटी बाबा अभय सिंह यांच्याविरुद्ध जयपूरमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिप्रापथ पोलिस ठाण्याला माहिती मिळाली होती की आयआयटी बाबा रिद्धी-सिद्धी येथील एका हॉटेलमध्ये थांबला असून तिथे गोंधळ घालत आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, जिथे झडती दरम्यान आयआयटी बाबा अभय सिंह याच्याकडे गांजा सापडला. तथापि, जप्त केलेल्या औषधाचे प्रमाण खूपच कमी होते, ज्यामुळे तो कमी दर्जाचा गुन्हा मानला गेला. पोलसांनी अखेर कडक सूचना देत आयआयटी बाबा अभय सिंहला सोडून दिले. या घटनेनंतर आयआयटी बाबा पुन्हा चर्चेत आले आहेत.
आयआयटी बाबा अभय सिंहविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल पार्क क्लासिकमध्ये राहणारा अभय सिंग आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.
हे ही वाचा :
तेजस्वी यादव यांची ५६ इंची जीभ, काय अपेक्षा करणार!
अबू आझमी यांना औरंग्याचा पुळका, म्हणाले चांगला प्रशासक होता!
महाकुंभ मेळा संपला पण संगमात स्नान करण्यासाठी भाविकांची ये-जा सुरूच!
दिल्लीतील विजेच्या पायाभूत सुविधांची वाईट स्थिती आम आदमी पार्टीमुळे
घटनास्थळी पोलीस दाखल होताच आयआयटी बाबाने स्वतःकडील गांजाचे एक पॅकेट काढले आणि ते पोलिसांना दाखवले. आत्महत्येप्रकरणी विचारपूस केली असता बाबा म्हणाले, ‘मी गांजाच्या नशेत होतो.’ मी काय बोललो ते मला माहिती नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाचे वजन १.५० ग्रॅम होते, जे पोलिसांनी जप्त केले आहे. गांजाचे प्रमाण कमी असल्याने त्यांना इशारा देऊन सोडून देण्यात आले. सध्या याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.