१३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्याची नुकतीच २६ फेब्रुवारी रोजी समाप्ती झाली. देशातील भाविकांसह परदेशातील नागरिकांनीही गंगा, यमुना आणि सरस्वती अशा त्रिवेणी संगमात स्नान केले. महाकुंभ मेळ्यात तब्बल ६५ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. याच दरम्यान, महाकुंभ संपल्यानंतरही प्रयागराजमध्ये भाविकांचे आगमन सुरूच आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या विविध भागातून भाविक येत आहेत.
प्रयागराजमध्ये आलेल्या एका भाविकाने सांगितले, गर्दी टाळण्यासाठी महाकुंभमेळा संपल्यानंतर येण्याची योजना आखली होती. महाकुंभ मेळ्यानंतरही संगमातील पाणी तितकेच पवित्र आहे जितके ते शतकानुशतके आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १४ भाविकांचा एक गट प्रयागराजमध्ये शनिवारी दाखल झाला. गटातील ७१ वर्षीय सुरेश धांगे म्हणाले, प्रयागराजमध्ये पाच दिवस घालवल्यानंतर वाराणसी, अयोध्या, चित्रकुट आणि मथुरा या ठिकाणी जाऊ आणि १२ मार्चला घरी परतू. ते म्हणाले, महाकुंभ मेळ्यानंतरही संगमाच्या काठांवर श्रद्धेची लाट अजूनही कायम आहे. स्थानिक पुजारी म्हणाले, जे भाविक महाकुंभ मेळ्यात येवू शकले नाहीत ते आता संगमात स्नान करून पुण्य-लाभ मिळवत आहेत.
हे ही वाचा :
…अन हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड पोहोचले अधिवेशनात!
जॉर्डन-इस्रायल सीमेवर झालेल्या गोळीबारात केरळमधील व्यक्तीचा मृत्यू!
पायाभूत सुविधा, लोकोपयोगी योजनांसाठी पुरवणी मागण्या सादर
विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे
दरम्यान, महाकुंभ मेळ्याच्या ४५ दिवसात तब्बल ६६ कोटी ३० लाख भाविकांनी संगमात स्नान केले. विशेष म्हणजे, भाविकांची ही संख्या चीन आणि भारत वगळता अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांसह सर्व देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. देशासह, जगभरात महाकुंभ मेळ्याची चर्चा झाली. परदेशातील अनेक नागरिक महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आनंद व्यक्त केला. महाकुंभ मेळ्यामध्ये अनेकांना रोजगार मिळाले तर अनेकांचे नशीबही चमकले आहेत.