मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कोल्ड्रिफ कफ सिरप पिल्याने झालेल्या बाळांच्या मृत्यूच्या प्रकरणात सरकार सातत्याने कठोर पावले उचलत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी सांगितले की या सिरप उत्पादक कंपनीच्या मालकाच्या अटकेसाठी मध्य प्रदेश पोलिस चेन्नई आणि कांचीपुरम येथे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोल्ड्रिफ कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक केली जाईल आणि त्यासाठी राज्याची पोलीस पथकं चेन्नई आणि कांचीपुरमकडे रवाना झाली आहेत.
याआधी उपमुख्यमंत्री शुक्ल यांनी नागपूरमध्ये उपचार घेत असलेल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली. निकृष्ट दर्जाच्या कफ सिरपच्या सेवनामुळे आजारी पडलेली मुलं नागपूरमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शुक्ल यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एम्स आणि न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटल, नागपूर येथे जाऊन उपचार घेत असलेल्या पाचही मुलांच्या आरोग्य स्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा केली.
हेही वाचा..
गुंतवणुकीच्या नावाखाली ३.२६ कोटींची फसवणूक
ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगालमध्ये हिंदूंचं जगणं कठीण
अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांमुळे तरुणांना प्रगतीची सुवर्णसंधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी!
कफ सिरप प्रकरणावरून अनेक कारखान्यांची चौकशी
उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टरांना निर्देश दिले की मुलांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात. त्यांच्या लवकरात लवकर आरोग्यलाभासाठी सर्व प्रयत्न करण्यात यावेत आणि तज्ञ डॉक्टरांची विशेष टीम सातत्याने मॉनिटरिंग करत राहील. शुक्ल यांनी मुलांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. मुलांच्या उत्तम उपचारासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य दिलं जाईल. उपचाराचा खर्च सरकार उचलणार असून मुलं पूर्णपणे बरी होईपर्यंत सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री मोहन यादव हे या संपूर्ण प्रकरणात अतिशय संवेदनशील आहेत आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया भागात काही मुलांना ताप, सर्दी आणि खोकला झाला होता. त्यांना कोल्ड्रिफ कफ सिरप दिलं गेलं आणि त्यानंतर आत्तापर्यंत 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात राज्य सरकार अत्यंत कडक भूमिका घेत आहे. मुख्यमंत्री मोहन यादव स्वतः पीडित कुटुंबांशी भेटले होते आणि सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं होतं. या प्रकरणात रुग्णाला औषध लिहून देणाऱ्या डॉक्टराला अटक करण्यात आली आहे, तसेच तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.







