25 C
Mumbai
Saturday, November 26, 2022
घरविशेषया प्रसिद्ध अभिनेत्याचा व्यायाम करताना झाला मृत्यू

या प्रसिद्ध अभिनेत्याचा व्यायाम करताना झाला मृत्यू

अतिरिक्त व्यायाम जीवावर बेतला

Google News Follow

Related

टिव्ही जगतासाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. कसौटी जिंदगी की फेम सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांने वयाच्या ४६ वर्षी जगाचा निरोप घेतलाय. शुक्रवारी सकाळपासून सिद्धांतला अस्वस्थ वाटत असूनही तो जिममध्ये गेला. व्यायाम करत असताना अचानक त्याला हृदविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने सिद्धांत याच्यावर उपचार केले. त्याला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले. मात्र डॉक्टरांना अपयश आले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. सिद्धांत १५ डिसेंबरला आपला ४७ वा वाढदिवस साजरा करणार होता. राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांच्यानंतरचा हा तिसरा मृत्यू आहे ज्यांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झालाय.

सिद्धांत इंडस्ट्रीत चांगले काम करत होता. इंडस्ट्रीशी दीर्घकाळ निगडीत होता आणि त्याचे अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते. सिद्धांत हा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता. पण त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मॉडेलिंगमध्ये यश प्राप्त केल्यानंतर त्याने टीव्हीमध्ये पाऊल ठेवले व आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपली ओळख निर्माण केली. त्याची पहिली टीव्ही मालिका कुसुम होती. त्यानंतर तो थांबलाच नाही. यानंतर सिद्धांत अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये दिसला. ज्यामध्ये तो कसौटी जिंदगी की, कृष्णा अर्जुन, क्या दिल में है यासारख्या मालिका त्यांनी गाजवल्या आणि कारकिर्दीत भरारी घेतली. क्यों रिश्तों में कट्टी बत्ती आणि जिद्दी दिल हे त्याच्या शेवटच्या मालिका ठरल्या.

हे ही वाचा:

मोरबी दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या माजी आमदाराला भाजपाकडून बक्षीस

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

सिद्धांत वीर सूर्यवंशी हा त्याच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला. या सिद्धांतने दोन विवाह केले आहेत. त्याचे पहिले लग्न इरा नावाच्या मुलीशी झाले होते. मात्र २०१५ मध्ये ते तुटले. यानंतर सिद्धांतने अॅलिसिया या युवतीबरोबर आपला संसार थाटला. सिद्धांतला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आणि दुसऱ्या लग्नापासून एक मुलगा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,974अनुयायीअनुकरण करा
52,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा