31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी पोलीस फोडणार

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी पोलीस फोडणार

रतानगिरी आरटीओ कडून वाहतुकीसाठी पथके नेमण्यात आली असून, वाहतूक सुरळीत व कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ते उपाय योजना करणार आहेत.

Google News Follow

Related

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीसाठी जिल्हा प्रशासनाने कोकणी चाकरमन्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कुठेही वाहतूककोंडी होऊ नये, अवेध वाहतुकीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी आरटीओ कडून २८ ऑगस्ट पासून, कशेडी घाट ते राजापूरपर्यंत ४ गस्त पथके नेमण्यात येणार आहेत. वाहतूक नियोजनासाठी त्यांचा उपयोग करण्यात येणार आहे. कोणतेही गैर-अनुचित प्रकार घडू नये म्हणून, आरटीओ कडून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याची खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आरटीओ अधिकारी अजित ताम्हणकर यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी जातात. यामध्ये दुचाकी, खाजगी चारचाकी वाहने, सार्वजनिक एस. टी. बसेस, रेल्वे, ट्रॅव्हल्स आदी वाहनातून चाकरमनी आपल्या इच्छित स्थळी पोहोचत असतात. या प्रवासा दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत व गर्दीच्या वेळी वाहनांचे अपघात होऊ नये यासाठी रत्नागिरी आरटीओ कार्यालयाकडून प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच या गस्तीसाठी आरटीओ व पोलीस दल यांच्याकडून महामार्गावर दरवर्षी गस्त पथके नेमली जातात.

हे ही वाचा:

चाकरमान्यांनो टोल भरू नका

काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले

न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

तसेच हे पथक २४ तास महामार्गावर गस्त घालणार असून, १२ तासांच्या शिफ्टमध्ये पोलिसांची ड्युटी लावण्यात येणार आहे, एका पथकात ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, ही पथके २८ ऑगस्ट पासून कार्यरत होणार आहेत. संशयित वाहनांची तपासणी, प्रवाशांची वाहनामधील क्षमता तपासली जाईल, शिवाय महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे, तसेच महामार्गावर आरटीओ पथकांशिवाय महामार्ग पोलीस, जिल्हा पोलीसही कार्यरत असतील, नियमांचे अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी आरटीओ मार्फत जयंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण पथके काम करणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा