29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषन्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Google News Follow

Related

न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांनी शनिवारी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली, ज्यांच्या शपथविधी समारंभात न्यायमूर्ती एनव्ही रमणा देखील उपस्थित होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका संक्षिप्त समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. या समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.

सर न्यायाधीश एन.व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असेल आणि ते ८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदावरून निवृत्त होतील.

उदय उमेश लळीत भारताचे नवे सरन्यायाधीश यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ रोजी सोलापूर, महाराष्ट्र येथे झाला. जून १९८३ मध्ये त्यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीला झाली. त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये दिल्लीत येण्यापूर्वी डिसेंबर १९८५ पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.

हे ही वाचा:

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

गुन्हे कायद्यातील तज्ज्ञ

भारताचे नवे सरन्यायाधीश लळीत हे फौजदारी कायद्यातील तज्ज्ञ आहेत. २ जी प्रकरणांमध्ये त्यांनी सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे ते सलग दोन वेळा सदस्यही राहिले आहेत. अतिशय सौम्य स्वभावाचे उदय उमेश लळीत हे भारताच्या इतिहासातील दुसरे सरन्यायाधीश आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले नाहीत. अतिशय या मृदू स्वभाव असलेले उदय लळीत हे भारताच्या इतिहासातील दुसरे सरन्यायाधीश आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले नाहीत. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या आधी १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश एसएम सिक्री यांनी ही कामगिरी केली होती.

अयोध्या-बाबरी खटल्यापासून दूर राहून चर्चेत 

१० जानेवारी २०१९ रोजी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी अयोध्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठापासून स्वत:ला वेगळे केले हाेते. सुमारे २०वर्षांपूर्वी ते अयोध्या वादाशी संबंधित एका फौजदारी खटल्यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या बाजूने खटला लढला हाेता. त्यामुळे न्या. लळीत यांनी खंडपीठातून माघार घेतली हाेती.

अनेक महत्त्वाचे निर्णय दिले

भारताचे नवे सरन्यायाधीश लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे तीन तलाक, केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरावरील त्रावणकोर राजघराण्याचा दावा आणि पॉस्को संबंधित कायदा, असे निर्णय त्यांनी घेतले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा