32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरविशेषहवाई अभ्यासच्यावेळी सुखोई - मिराज विमाने हवेत धडकली

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडकली

राजस्थानातही विमान कोसळले, एकाच दिवशी तीन दुर्घटना

Google News Follow

Related

 

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दोन मोठे अपघात झाले आहेत. या घटनेमध्ये वायू दलाची सुखोई-३०, मिराज २००० आणि चार्टर्ड विमाने कोसळली आहेत. सुखोई-३० आणि मिराज२००० ही दोन्ही विमाने हवेत एकमेकांना धडकली आणि कोसळली आहेत. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे.  मध्यप्रदेश २ आणि राजस्थानमध्ये १ असे एकाच दिवशी तीन भीषण अपघात झाले आहेत. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. मुरैना येथे हवाई दलाचे सुखोई-३० एमकेआय आणि मिराज-२००० हे विमान कोसळल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरतपूरमध्ये कोसळलेल्या चार्टर्ड विमानाने आग्रा येथून उड्डाण केले होते. त्याचवेळी मोरेना येथे कोसळलेल्या विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते.

भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.भरतपूरच्या पिंगोरा रेल्वे स्थानकाजवळ हा मोठा अपघात झाला. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. वायुसेना आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

हे ही वाचा:

इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखोई-३० आणि मिराज २००० ने ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले. हवाई कसरतीचा दरम्यान हा अपघात झाला दोनी विमाने हवेतच एकमेकांना धडकली आणि या विमानांनी पेट घेतला . जाळणारी विमाने बघता बघता खाली कोसळली असे स्थानिक लोकांनी सांगितले .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा