24 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषमादी चित्ता 'वीरा'ने दोन बछड्यांना दिला जन्म, संख्या २६ वर पोहोचली!

मादी चित्ता ‘वीरा’ने दोन बछड्यांना दिला जन्म, संख्या २६ वर पोहोचली!

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती 

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील शेओपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात (केएनपी) आणखी दोन चित्त्यांच्या पिल्लांचा जन्म झाला आहे. मंगळवारी (४ फेब्रुवारी) मादी चित्ता ‘वीरा’ने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे कुनो राष्ट्रीय उद्यानातील एकूण चित्त्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे. यामध्ये १४ बछडे आणि १२ प्रौढांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नवजात बछड्यांचा फोटो शेअर करत ही बातमी दिली. मध्य प्रदेशच्या ‘जंगल बुक’मध्ये दोन चित्त्यांच्या पिल्लांचा समावेश झाला,” असे त्यांनी लिहिले. मध्य प्रदेशच्या भूमीवर चित्त्यांची संख्या सतत वाढत आहे ही माहिती शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. आज, मादी चित्ता वीराने दोन लहान पिल्लांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशच्या भूमीवर चित्त्याच्या पिल्लांचे स्वागत आहे आणि मी या लहान पिल्लांच्या आगमनाबद्दल राज्यातील जनतेचे मनापासून अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री यादव यांनी चित्ता संवर्धन प्रकल्पात सहभागी अधिकारी, पशुवैद्य आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. “त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज मध्य प्रदेश ‘चित्त्यांची भूमी’ म्हणूनही ओळखला जातो,” असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हणाले, चित्त्यांच्या वाढत्या संख्येचा राज्याच्या पर्यटन उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल. चित्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, मध्य प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळत आहे आणि रोजगाराची नवी दारे उघडत आहेत.

हे ही वाचा : 

यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा दावा करणाऱ्या केजरीवालांविरोधात हरियाणामध्ये गुन्हा दाखल

निवडणुकीपूर्वी दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून ५ लाख रुपये जप्त

युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभाग असलेली गाझा पट्टी ताब्यात घेऊन विकास करणार!

दिल्लीच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

आम्ही चित्त्यांसह सर्व वन्यजीवांचे संवर्धन आणि पुनर्संचयित करण्यासाठी नेहमीच तयार आहोत,” असे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आठ नामिबियन चित्ते भारतात आणण्यात आले होते. यामध्ये पाच मादी आणि तीन नर होते. आतापर्यंत एकूण १० चित्ते मरण पावलेत, ज्यामध्ये सात प्रौढ आणि तीन पिल्लांचा समावेश आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा