पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांसाठीची मंत्रिमंडळ समिती (CCEA) ने चार राज्यांतील चार मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यावर २४,६३४ कोटी खर्च होणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यांतील १८ जिल्ह्यांना जोडणारे हे प्रकल्प भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे ८९४ किमीची वाढ करतील.
सरकारच्या निवेदनानुसार, या प्रकल्पांत महाराष्ट्रातील वर्धा-भुसावळ दरम्यान ३१४ किमी लांबीची तिसरी व चौथी लाईन, महाराष्ट्र-छत्तीसगडमधील गोंदिया-डोंगरगड दरम्यान ८४ किमी चौथी लाईन, गुजरात-मध्य प्रदेशमधील बडोदा-रतलाम दरम्यान २५९ किमी तिसरी व चौथी लाईन आणि मध्य प्रदेशातील इटारसी-भोपाल दरम्यान २३७ किमी बीना चौथी लाईन समाविष्ट आहे.
हेही वाचा..
गाझामधील इस्रायली कारवाईविरुद्ध माकपाचे आंदोलन
एआय उत्पादने, सेवा तयार करण्याचे ग्लोबल हब बनण्याची क्षमता
‘या’ संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित
मध्यप्रदेश सिरप प्रकरण : गुजरातमधील दोन औषध उत्पादक कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात
हे प्रकल्प सुमारे ८५.८४ लाख लोकसंख्या असलेल्या ३,६०० हून अधिक गावांना जोडणी देतील आणि विदिशा व राजनांदगाव या दोन ‘आकांक्षी जिल्ह्यांचा’ही यात समावेश असेल. या नवीन लाईनमुळे प्रवासी, माल आणि सेवांच्या अखंड वाहतुकीला चालना मिळेल आणि रेल्वेची कार्यक्षमता तसेच विश्वासार्हता वाढेल. हे प्रकल्प रेल्वे जाळ्यातील गर्दी कमी करून कार्यप्रणाली अधिक सुटसुटीत करण्यास मदत करतील.
हे सर्व प्रकल्प “प्रधानमंत्री गतिशक्ति राष्ट्रीय मास्टर प्लॅन”नुसार राबवले जाणार असून, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यावर भर असेल. सांची, सतपुडा टायगर रिझर्व्ह, भीमबेटका, हजारा धबधबा आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांसारख्या पर्यटन स्थळांनाही यामुळे रेल्वे जोडणी मिळेल. या मार्गांचा वापर कोळसा, सिमेंट, धान्य, स्टील आणि कंटेनर मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जाईल. क्षमता वाढीमुळे दरवर्षी सुमारे ७८ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक होईल.
रेल्वे हे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम साधन असल्याने हे प्रकल्प देशाच्या हवामान उद्दिष्टांना साध्य करण्यात, तेल आयात (२८ कोटी लिटर) कमी करण्यात आणि कार्बन उत्सर्जन (१३९ कोटी किलो) कमी करण्यात मदत करतील — जे सुमारे ६ कोटी झाडे लावण्याइतके पर्यावरणीय मूल्य देईल.







