उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. पतीच्या त्रासामुळे एका मुस्लिम महिलेने तिच्या पतीला सोडचिठ्ठी देवून हिंदू मुलाशी लग्न केले आहे. तिने आपला धर्म बदलत सबिना वरून सुमन बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सबीनाचे लग्न बदायूं येथील रहिवासी सद्दामशी झाले होते. मात्र, सबीनाचा पती सद्दाम तिला त्रास देत असे आणि छळ करत असे, असा तिचा आरोप आहे. याच दरम्यान, विजय या हिंदू तरुणाच्या ती प्रेमात पडली. पती सद्दामच्या त्रासामुळे तिने सनातन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
सबिना ८ महिन्यांपूर्वी तिच्या पतीचे घर सोडून तिचा प्रियकर विजयसोबत आली. हिंदू पद्धतीनुसार तिने एका मंदिरात विजयशी लग्न केले. यानंतर सबिना वरून ती सुमन झाली. ती म्हणाली, माझे पूर्वज पूर्वी हिंदू होते. यामुळे स्वतःच्या इच्छेने धर्म बदलला आणि घरी परतले.
या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबाने प्रेम जोडप्याला घराबाहेर काढले होते. परंतु घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते नरेंद्र सोमवंशी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विजय या तरुणाच्या कुटुंबीयांना बोलावून दोघांच्याही कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न लावून दिले.
हे ही वाचा :
ममता बॅनर्जी म्हणतात, प. बंगालमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू करणार नाही
बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सने टिपला एक नक्षलवादी!
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना विजय दिवस परेडसाठी दिले आमंत्रण
रामलल्लांचे सूर्य तिलक हे पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे फळ
सुमन पुढे म्हणाली, स्वतःच्या इच्छेने धर्म बदलत आहे आणि लग्न करत आहे. यासाठी कोणाचा कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. तरुणाचे देखील हेच बोलणे आहे. दरम्यान, या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे आणि लोक त्या मुला-मुलीच्या धाडसाबद्दल बोलत आहेत.