पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आतापर्यंत एकूण २२ जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (८ एप्रिल) वक्फ दुरुस्ती कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी करत जंगीपूर परिसरात आयोजित या निषेध रॅलीत हजारो लोक जमले होते. पण लवकरच या निषेध रॅलीला हिंसक वळण लागले आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यादरम्यान अनेक पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि त्यांना आग लावण्यात आली.
या प्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. जांगीपूरचे एसपी आनंदा रॉय यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, काल याठिकाणी हिंसाचार उसळला होता, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी कारवाई करत गुन्हेगारांना अटक केली. याठिकाणी भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम १६३ लावण्यात आला आहे. इंटरनेट देवा देखील बंद करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात आहे. दगडफेक खरोखरच झाली होती. पोलिसांच्या दोन गाड्या जाळण्यात आल्या. आम्ही सर्व कायदेशीर कारवाई केली आहे. २२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी ८ जणांना पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत घेण्यात येत आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एसपी आनंदा रॉय यांनी सांगितले.
हे ही वाचा :
बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सने टिपला एक नक्षलवादी!
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना विजय दिवस परेडसाठी दिले आमंत्रण
रामलल्लांचे सूर्य तिलक हे पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे फळ
हिंदूंवरील आक्षेपार्ह विधानानंतर भाजपा- आप आमदारांमध्ये हाणामारी
दरम्यान, मुर्शिदाबादमधील हिंसाचाराबद्दल भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली होती. “पश्चिम बंगाल पोलिस मुर्शिदाबादच्या रस्त्यांवरून उफाळून येणाऱ्या हिंसक इस्लामी जमावाला रोखण्यासाठी संघर्ष करत आहेत – कदाचित गृहमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच निर्देशानुसार. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे सध्याच्या अशांततेला थेट हातभार लागला आहे,” असे अमित मालवीय म्हणाले.
#WATCH | Jangipur (West Bengal) violence | Jangipur SP Ananda Roy says, "Violence erupted here yesterday. There had been a law and order problem, Police took action and made arrests. 163 BNSS is in effect here. Internet is suspended here. Things are under control…Stone pelting… pic.twitter.com/mzVraanIep
— ANI (@ANI) April 9, 2025