29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष आरटीपीसीआर चाचणी नसेल तर विमानप्रवेश नाही

आरटीपीसीआर चाचणी नसेल तर विमानप्रवेश नाही

Related

वाराणसी ते मुंबई प्रवास करणाऱ्यांची परवड

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांनुसार उत्तर प्रदेशहून मुंबईला हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केल्यामुळे या प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. शनिवारी वाराणसी विमानतळावरून मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक होते. तो अहवाल नसेल तर विमानात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे विमानप्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. अशी चाचणी अनिवार्य आहे, असे आम्हाला कळविण्यातच आले नव्हते. ते आधी सांगितले असते तर आम्ही चाचणीचा अहवाल सोबत आणला असता, असे प्रवासी सांगत होते. १३ मे रोजी मुंबई महानगरपालिकेकडून सर्व विमानकंपन्यांना ही सूचना देण्यात आली की, देशातील कोणत्याही भागातून मुंबईत हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच त्या प्रवाशाला विमानात प्रवेश दिला जाईल, अशीही सूचना करण्यात आली होती.

हे ही वाचा:

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

भाजपा उद्योग आघाडीतर्फे नाशिक महानगरपालिकेला व्हेन्टिलेटर्स

आजमगढहून वाराणसी विमानतळावर आलेले गामा गुप्ता हे कुटुंबीय अंबरनाथला राहते. मुंबईला येण्यासाठी गुप्ता कुटुंबीय वाराणसी विमानतळावर दाखल झाले. पण त्यांना विमानात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. विमान कंपनीनेही आपल्याला अशा चाचणीची कोणतीही कल्पना दिली नव्हती. जर आम्हाला नियम माहीत असता तर आम्ही विमानतळावर आलोही नसतो, असे गुप्ता म्हणाले. या नियमामुळे वाराणसी विमानतळावर गोंधळाचे वातावरण आहे. महत्त्वाचे म्हणजे वाराणसी विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीची कोणतीही व्यवस्था नाही. अशा वेळी प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. विमानप्रवाशांच्या या अडचणींचा वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू असून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रकार विजय सिंह यांनी ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा