32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषआईच्या निधनामुळे संतापून इंग्रजांविरुद्ध त्या तरुणाने बंडाचे निशाण उभारले!

आईच्या निधनामुळे संतापून इंग्रजांविरुद्ध त्या तरुणाने बंडाचे निशाण उभारले!

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा संघर्ष

Google News Follow

Related

भारतावर इंग्रजांचे राज्य असतानाचा तो काळ. पुण्याच्या कम्ट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंट या विभागात काम करणाऱ्या त्या तरुणाची आई आजारी होती. तिला घरी जाऊन बघता यावे म्हणून त्या तरुणाने सुट्टीसाठी अर्ज केला, पण त्याला सुट्टी मिळाली नाही. आईची भेट घेता आली नाही. आईचे त्यातच निधन झाले. त्यामुळे तो तरुण संतापला. आपल्या मातेशी तिच्या लेकराची ताटातूट करणाऱ्या इंग्रज सरकारचा सूड घ्यायचा, हा निश्चय त्या तरुणाने केला. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हाच तो तरुण. आज आद्यक्रांतिकारक वासुदेव फडके यांची पुण्यतिथी. (१७ फेब्रुवारी १८८१)

सकल सुखाचा त्याग करूनि साधिजे तो योग. राज्य साधनेची लगबग, कैसी केलीl त्याहूनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या समर्थांच्या उक्तींप्रमाणे या तरुणाने स्वतःच्या जीवनाचा त्याग करत संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी वाहिले. घरदार सोडले. तेव्हा दुष्काळ पडला होता. इंग्रज सरकारच्या गलथान कारभारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत होते. इंग्रजांबद्दल त्याच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. त्यातून मग सशस्त्र बंडाची ठिणगी बाहेर पडली. रामोशी, भिल्ल, मांग, कोळी, आगरी, ब्राह्मण अशा सगळ्या जातीपातीतील लोकांना एकत्र करून वासुदेव फडकेंनी संघटन उभे केले. त्यांना शस्त्रवापराचे प्रशिक्षण दिले. गद्दार धनाढ्यांना लुटून त्यातून मिळालेल्या संपत्तीचा राष्ट्रकार्यासाठी उपयोग केला.

हे ही वाचा:

सुप्रिया सुळे हिंदुराष्ट्राची मागणीही करतील बहुधा…

मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के

विदेशात नाही भुर्र; आता काश्मीर टूर

बाजीप्रभूच्या भूमिकेतील अजय पूरकरच्या घरी जायचेय का?

राष्ट्रकार्य, समाजकार्यासाठी आध्यात्मिक बैठकही अतिशय आवश्यक आहे, असा त्यांचा विचार होता.

गाणगापूर येथे असताना इंग्रजांना ते तिथे असल्याचे कळले आणि त्यांनी वासुदेव फडकेंना पकडण्यासाठी जाळे टाकले. इंग्रज अधिकारी डॅनियलला त्या कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी गावाला वेढा घातला पण वासुदेव फडके तिथून निसटले. मात्र त्यांची काही कागदपत्रे इंग्रजांच्या हाती सापडली. त्यात इंग्रजांविरुद्ध केलेल्या कटाची माहिती मिळाली. फितुरीमुळे वासुदेव फडके यांचा ठावठिकाणा अखेर इंग्रजांना मिळाला. २१ जुलै १९७९ला निद्रावस्थेत असताना काही सहकाऱ्यांसह इंग्रजांनी त्यांना पकडले. नंतर त्यांच्यावर खटला चालवून त्यांना एडन येथील तुरुंगात रवाना करण्यात आले. तुरुंगातील हाल, तेथील वातावरण यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यातच क्षयरोगाने त्यांना पछाडले. १७ फेब्रुवारी १८८३मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा