25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचे करणार प्रकाशन

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्राच्या या दौऱ्यात शाह हे पुणे, नागपूर, आणि कोल्हापूर इथल्या कार्यक्रंमांना हजेरी लावणार असून २६ फेब्रुवारीला होणाऱ्या कसबा पेठ निवडणूक आणि  पिंपरी चिंचवड विधानसभा या पोटनिवडणुकीसाठी शाह यांचा हा दौरा असल्याचे बोलले जाते. नुकत्याच झालेल्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी मध्ये झालेल्या भाजपच्या कामगिरीनंतर अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ मध्ये भाजपचा पराभव झाला होता. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले. भाजपने केवळ कोकणच्या शिक्षक मतदार संघाचा विजय मिळवला. आहे.  आज शुक्रवारी अमित शाह हे प्रथम नागपुरात आल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे आणि लाईट शो या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर उद्या शनिवारी १८ फेब्रुवारीला ते  दीक्षाभूमीला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत लगेचच ते शनिवारी दुपारी ते पुण्याला जायला रवाना होतील.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

दिनांक १९ फेब्रुवारीला रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्त ते शिवजयंती साजरी करणार आहेत. अमित शाह यांच्या हस्ते रविवारी शिवजयंतीला शिवसृष्टी या मराठा योद्धा राजाचे जीवन कार्य दर्शवणाऱ्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य या थिम पार्कचे उदघाटन करण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर अमित शाह संध्याकाळी कोल्हापूरला प्रयाण करतील. या सर्व कार्याक्रमांसोबतच गृहमंत्री अमित शाह हे कसबापेठ आणि पिंपरी  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी अमित शाह यांच्याबरोबर अनेक भाजप नेत्यांबरोबर बैठका सुद्धा होणार आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा