29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषमाजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचा जीवनप्रवास 'ओटीटी'वर

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचा जीवनप्रवास ‘ओटीटी’वर

Google News Follow

Related

भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्यावर एक वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट निर्माते प्रकाश झा यांनी सोमवारी एक याबाबत घोषणा केली असून ‘अहा’ ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्यावर सीरिज बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या सीरिजचे नाव ‘हाफ लायन’ असे असणार आहे.

‘अहा’ स्टुडिओ आणि एप्लोज एंटरटेनमेंट यांनी एकत्र येऊन ही सिरीज बनवली असून अनेक भाषांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत २०२३ साली ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आजच्या पिढीतील फार कमी लोकांना पी व्ही नरसिंह राव यांच्याबद्दल माहिती आहे. त्यांनी भारताला बदलले आहे आणि या गोष्टी लोकांना समजायला हव्यात म्हणून ही सीरिज बनवत असल्याचे झा यांनी सांगितले. सीरिजचे निर्माते म्हणाले की, पी व्ही नरसिंह राव यांनी कधीच त्यांनी आणलेल्या आर्थिक सुधारणांचे श्रेय घेतले नाही. मात्र, या सीरिजमुळे त्यांचे काम प्रसिद्धीच्या झोतात येईल, असेही दिग्दर्शकाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

आमचा उमेदवार गरीब होता; नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण

चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

चीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य

हेल्मेट घाला, वाहन हळू चालवा नाहीतर…

‘त्यांनी भारताला ते आर्थिक स्वातंत्र्य दिले होते, ज्यासाठी आपण सुमारे ४५ वर्षे लढलो होतो. त्यांनी आपल्या देशात अर्थव्यवस्था, राजकीय, समाज आणि दैनंदिन बदल घडवून आणले. आज आपण जे आहोत, ते त्या पाच वर्षांमुळे आहोत. चांगले, वाईट काहीही असो, पण आज आपण जे आहोत ते त्या पाच वर्षांमुळेच,’ असे प्रकाश झा म्हणाले.

सीरिजमधील कलाकारांबाबत अद्याप इतर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कलाकारांचा शोध सुरू झाला आहे. पी व्ही नरसिंह राव हे १९९१ ते १९९६ या काळात भारताचे पंतप्रधान होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा