दिल्लीतील नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसंदर्भात भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख जाहीर झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. शपथविधीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही परंतु असे मानले जाते की विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर दोन ते तीन दिवसांनी शपथविधी समारंभ होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पंतप्रधान मोदी आज रात्री उशिरा त्यांच्या अमेरिका दौऱ्यावरून नवी दिल्लीला परतत आहेत. पंतप्रधान मोदी देशात परतताच, दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर विचारमंथन होईल.
दिल्लीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक नावांची चर्चा आहे. पण अंतिम निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते आणि आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत ७० पैकी ४८ जागांवर मुसंडी मारत भाजपने आम आदमी पक्षाचा पराभव केला आणि २७ वर्षांनी दिल्लीत पुन्हा सत्तेत आले.
हे ही वाचा :
बांगलादेशात शोलोहाटी दुर्गा मंदिरावर कट्टरवाद्यांचा हल्ला, मूर्तींची केली तोडफोड!
बिजापूर चकमकीत आयईडी स्फोटाच्या मास्टरमाइंडचा खात्मा
राजस्थानच्या धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक, २६ गायींची सुटका!
मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’