पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. नवा कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन कसोटी सामने खेळणार आहे. अशातच सध्या चर्चा आहे ती पाकिस्तानच्या संघाचं ऑस्ट्रेलियात झालेल्या आगमनाची. त्यांच्या या आगमनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विमानतळाबाहेरील हा व्हिडीओ आहे. यात पाकिस्तानी खेळाडू सिडनी विमानतळावर ट्रकमध्ये आपलं साहित्य स्वतः ठेवताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या संघात १८ खेळाडू आणि १७ सपोर्ट स्टाफसह मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत.
पाकिस्तानचा संघाची ही नव्या कर्णधारासोबतची नव्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली कसोटी मालिका आहे. यासाठी पाकिस्तानी खेळाडू लाहोरहून दुबईमार्गे सिडनीला पोहोचले आहेत. सर्वसामान्यपणे विमानतळावर पाकिस्तानी दुतावासातील अधिकारी असायला हवे होते पण तिथे कुणीही आलं नव्हतं. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिकारीही उपस्थित नव्हते. शिवाय इतरही कोणी त्यांच्या मदतीला नसल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे.
ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या पाकिस्तानी संघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात पाकिस्तानचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद रिझवान ट्रकमध्ये उभा असल्याचं दिसत आहे. इतर खेळाडूंचे साहित्य घेण्यासाठी तो मदत करत आहे. साहित्य घेऊन ते ट्रकमध्ये ठेवताना रिझवान दिसत आहे.
No official present from Pakistan embassy or Australia to receive Pakistani Players at Airport. Pakistan Players were forced to load their luggage on the truck.
— BALA (@rightarmleftist) December 1, 2023
हे ही वाचा:
२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक
अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!
बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!
अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातला पहिला सामना १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यात शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ खेळणार आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक अशी होती. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघाला ९ पैकी फक्त ४ सामन्यातच विजय मिळवता आला होता. त्यानंतर बाबर आझम याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.