काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात दिलेल्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ऑपरेशन सिंदूरला ‘साधी घटना’ म्हणणे केवळ निंदनीयच नाही, तर भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि १४० कोटी भारतीयांच्या भावनांचा अपमान आहे. त्रिवेदी म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष खडगे यांनी भारतीय लष्कराच्या अप्रतिम शौर्याचे प्रतीक असलेल्या ऑपरेशन सिंदूरला ‘साधी घटना’ म्हटले, हे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. याआधीही राहुल गांधींनी भारतीय विमान आणि संबंधित विषयांवर अनुचित वक्त्यव्ये केली होती, आणि ते याआधीही अनेक वेळा असे करत आले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी आणि आता खडगे यांच्या विधानांमुळे हे स्पष्ट झाले आहे की ‘इंडिया आघाडी’तील नेत्यांचे वक्तव्ये हे काही अपघाती नसून ठरवून केलेले आहेत. ही एक प्रकारची भारतविरोधी भूमिका आहे, जी पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या ऑक्सिजन पुरवते. ‘इंडिया आघाडी’ हे नाव घेऊन कोणी भारतीय होतो असे होत नाही. पाकिस्तानच्या संसदेत, त्यांच्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि संरक्षण दलांच्या ब्रीफिंगमध्ये इंडिया आघाडीतील नेत्यांची वक्त्यव्ये दाखवली जात आहेत. त्यामुळे या आघाडीचा खरा चेहरा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ पाकिस्तान’सारखा वाटतो.”
हेही वाचा..
बोनी कपूर यांनी आई आणि रेखा यांचा फोटो केला शेअर
छत्तीसगडमध्ये १ कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यासह ३० जणांचा खात्मा
देशभक्ती रक्तातून येते, फॉर्म भरून नाही
शहबाज शरीफ यांच्या विधानाचा उल्लेख करत त्रिवेदी म्हणाले, “पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्पष्टपणे सांगितले की, ९ व १० मेच्या रात्री २:३० वाजता त्यांना जागं केलं गेलं कारण भारताने त्याच्या नूर खान एअरबेसवर क्षेपणास्त्र हाणलं होतं. अशा गंभीर घटनेनंतरही खडगे आणि राहुल गांधी यांना ती ‘छिटपुट घटना’ वाटत असेल, तर त्यांच्या विचारांची पातळी किती खालची आहे हे दिसून येते. ही तीच काँग्रेस आहे, जिचे नेते पाकिस्तानात जाऊन तिथल्या लष्करप्रमुखांना मिठी मारतात. मणिशंकर अय्यर यांनी तर पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान मोदींना हटवण्याची विनंती केली होती. सोनिया गांधी यांनी तर दहशतवाद्यांसाठी अश्रूही ढाळले होते. यावरून स्पष्ट होते की काँग्रेसचे राष्ट्रवादाविषयी विचार किती पोकळ आहेत, आणि दहशतवाद्यांबाबत त्यांचे हृदय किती मऊ आहे.”
ते म्हणाले, “आज काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पाकिस्तानात पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे. खडगे यांचे विधान कर्नाटकातील स्थानिक राजकारणातून प्रेरित असू शकते. सिद्धरामय्या यांच्या विधानाने पाकिस्तानात प्रसिद्धी मिळाली, तर मग खडगे यांनाही ती मिळावी अशी इच्छा असू शकते. पण यासाठी जर देशाची प्रतिष्ठा आणि लष्कराच्या शौर्याचा अपमान केला जात असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे आम्ही या विधानाचा तीव्र निषेध करतो, आणि याला काँग्रेस व इंडिया आघाडीच्या एका नियोजित रणनीतीचा भाग मानतो.”
मुर्शिदाबाद हिंसेवरही टिप्पणी करत त्रिवेदी म्हणाले, “प्राप्त अहवालानुसार, विशेष तपास पथकाच्या (SIT) रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे की मुर्शिदाबादमधील हिंसा ही हिंदूंना लक्ष्य करून आणि योजनाबद्ध पद्धतीने घडवण्यात आली होती. यात तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी होते. पोलिसांनी या हिंसेला रोखण्याऐवजी तृणमूलच्या नेत्यांना पाठीशी घातल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते की मुर्शिदाबादपासून पवित्र अमरनाथ यात्रेच्या ठिकाणापर्यंत हिंदूंना लक्ष करून हिंसा केली जात आहे.”
