27.7 C
Mumbai
Saturday, August 1, 2026
घरविशेष२०२७ ठरणार पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष? एल निनोचा प्रभाव कायम

२०२७ ठरणार पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष? एल निनोचा प्रभाव कायम

मान्सून आणि शेतीवर संकटाची शक्यता

Google News Follow

Related

यंदाचे २०२६ हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरणार नसले, तरी खरी चिंता पुढील वर्षाची आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, यावर्षी सक्रिय झालेल्या शक्तिशाली एल निनो (El Niño) मुळे २०२७ हे पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरू शकते. या बदलाचा फटका केवळ तापमानवाढीपुरता मर्यादित राहणार नाही, तर भारतातील मान्सून, शेती, जलसाठे आणि अर्थव्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनो ही पॅसिफिक महासागरातील नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. या काळात विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढते. परिणामी, जगभरातील हवामान चक्रात मोठे बदल घडतात. भारतासाठी याचा सर्वात मोठा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होतो. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसाचे असमान वितरण आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढणे अशा घटना वारंवार घडू शकतात.

यंदाच्या मान्सून हंगामात जून महिन्यात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली होती. जुलैमध्ये काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला, तरी संपूर्ण हंगामावर एल निनोचा प्रभाव कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमुळे खरीप पिके, धरणांतील पाणीसाठा आणि सिंचन व्यवस्था यांच्यावर अतिरिक्त ताण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एल निनोचा सर्वाधिक प्रभाव तो सुरू झाल्यानंतरच्या पुढील वर्षात दिसून येतो. त्यामुळे २०२६ मध्ये त्याची सुरुवात झाली असली, तरी त्याचा सर्वाधिक परिणाम २०२७ मध्ये जाणवू शकतो. हवामान बदलामुळे आधीच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढलेले असताना, त्यात एल निनोची भर पडल्यास जागतिक तापमानाचे नवे विक्रम नोंदवले जाऊ शकतात.

हे ही वाचा:

विजेसाठी १२ वर्षांचा संघर्ष; जनता दरबारानंतर घरात प्रथमच पेटला बल्ब

मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार!

पुण्यात ९२ हजार कोटींची घरे विक्रीविना

गोव्यात औपचारिक दैनिक वेतनात २.५ टक्क्यांची वाढ

भारतात या परिस्थितीचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी शेती उत्पादन घटणे, अन्नधान्याच्या किमती वाढणे, पाण्याची टंचाई निर्माण होणे आणि विजेची मागणी वाढणे अशी अनेक आव्हाने देशासमोर उभी राहू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांनी आतापासूनच नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अचूक अंदाज लक्षात घेऊन पीक नियोजन करणे, कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या जातींची निवड करणे, तसेच जलसंधारण आणि सिंचन व्यवस्थेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा