33 C
Mumbai
Monday, March 17, 2025
घरविशेषदिल्लीतील अकबर रोडवरील फलकाला काळे फासले, लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोस्टर

दिल्लीतील अकबर रोडवरील फलकाला काळे फासले, लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोस्टर

युवकांचा व्हीडिओ व्हायरल

Google News Follow

Related

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुघलांबाबत लोकांच्या मनात एक संताप असून औरंगजेबाविषयी लोक विविध माध्यमातून चीड व्यक्त करत आहेत. दिल्लीतील अकबर आणि बाबर रोडवरही लोकांच्या या संतापाचा फटका बसला आहे. दिल्लीत अकबर रोड नावाच्या फलकावर काळे फासून काही तरुणांनी त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावले.

शुक्रवारी रात्री ही घटना घडली. अकबर रोड, बाबर रोड, हुमायूँ रोड या तिन्ही रस्त्यांवरील फलकांवर युवकांनी काळे फासले. या फलकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर्स या युवकांनी चिकटवले आणि शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या. युवकांचे हे व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा:

चीनच्या वुहान प्रयोगशाळेत कोविड सारखा बॅट विषाणू

काँग्रेसमध्ये शशी थरूर नाराज

अमेरिकेच्या एफबीआय संचालकांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ!

संभल हिंसाचार : १२ पैकी ६ प्रकरणात आरोपपत्र दाखल

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे कळते.

सध्या छावा हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित सिनेमा थिएटरमध्ये चांगलाच गर्दी जमवत आहे. तसेच लोकांना या चित्रपटातील संभाजी महाराजांची विकी कौशलने साकारलेली भूमिकाही खूप आवडली आहे. त्यांची ज्या निर्घृण पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली, त्यातून लोकांच्या मनात संताप आहे. गुजरातमध्ये एका तरुणाने चक्क थिएटरमध्ये शिरत पडदाच फाडला होता.

अकबर रोड, बाबर रोड, हुमायूँ रोड या रस्त्यांची नावे बदलली जावीत, अशी अनेकवेळा मागणी होत असते. मागे याचठिकाणी महाराणा प्रताप यांचे नावही फलकावर युवकांनी लावले होते. पण आता छावा चित्रपटाता परिणाम सर्वत्र जाणवत आहे. याआधी, अकबर रोडवरील फलकाला २०२१ मध्ये सम्राट हेमू विक्रमादित्य हे नाव चिकटविण्यात आले होते. २०१८मध्ये तिथे अटल मार्ग असेही लिहिण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा