परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो, असे म्हणतात. दिशा सालियान प्रकरणात तसेच काहीतरी घडताना दिसते आहे. या प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण लागले आहे. अत्यंत अनपेक्षित असे काहीतरी घडते आहे. मनसुख हिरेनच्या प्रकरणात अटकेत असलेला क्राईम ब्रांचचा अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. सचिन वाझेचे वर्णन ‘अ मॅन हू न्यू टू मच’ (A man who knew too much) असे करता येईल. वाझे माफीचा साक्षीदार बनायला तयार असेल, तर राजदत्त यांच्या ‘माफीचा साक्षीदार’ या सिनेमात माफीच्या साक्षीदारावर आलेली वेळ वाझेवर येणार नाही, याची काळजी आता राज्य सरकारने घ्यायला हवी. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांची एक सलग मालिका घडत होती. घटना वरकरणी वेगवेगळ्या वाटत होत्या, परंतु त्यात एक समान सूत्र होते. काही पात्रेही समान होती. सगळ्या ठिकाणी असलेले एक समान खलनायकी पात्र म्हणजे—सचिन वाझे. हा असा एक गारदी होता, जो हुकमांची तामील करायचा. वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. तो उलट्या काळजाचा होता. तो इसम म्हणजे सचिन वाझे. गुन्ह्यांच्या या मालिकेतील वाझे हा अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे. या गुन्ह्यांमध्ये नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत वाझेची भूमिका आहे. तो सध्या तळोजा तुरुंगात आहे. त्याने १३ खूनांच्या प्रकरणात माहिती देण्याची तयारी दाखवली आहे. अर्थात, तो माफीचा साक्षीदार बनायला तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीखाली प्रचंड मोठा धमाका करणारी ही बातमी आहे. मातोश्रीचे संपूर्ण पितळ यामुळे उघड पडू शकते. उद्धव ठाकरे यांचा खेळ खल्लास होऊ शकतो.



