30 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरराजकारणजरांगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणाला पोलिसांची परवानगी नाही

जरांगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणाला पोलिसांची परवानगी नाही

गणेशोत्सव, गर्दी आणि नियमांच्या उल्लंघनाचे कारण

Google News Follow

Related

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी तसेच आंदोलन व सभांच्या नियमावलीचा हवाला देत आझाद मैदान पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.

जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुकांसाठी २०२५ मध्ये ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झालेले नाही याकडे पोलिसांनी लक्ष वेधले आहे. नियमांनुसार आंदोलनासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशी वेळ निश्चित करण्यात आली असून, शनिवार, रविवार तसेच शासकीय किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी आंदोलनास मनाई आहे. १९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. याशिवाय ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील’, असे जरांगे यांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हे आंदोलन वेळेत संपणार नाही, हे स्पष्ट असल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये पद्मा नदीत बोट उलटली

नाही प्रदूषण, नाही धूर; वंदे भारत आता पश्चिम घाटातून

‘कॉक्रोच पार्टी’ महाराष्ट्रात गरम पंजाबात नरम

जे देखे शशी ते काँग्रेस बघेल कशी ?

मागील आंदोलनातील नियमाभंगाचा दाखला

परवानगी नाकारताना पोलिसांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या आंदोलनातील अनुभवाचा विशेष उल्लेख केला आहे. त्या वेळी आंदोलन संध्याकाळी ६ वाजता आटोपणे अपेक्षित असताना ते २ सप्टेंबरपर्यंत सुरू राहिले होते. या खेपेलाही आंदोलन वेळेत स्थगित होणार नाही, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. मागील आंदोलनादरम्यान ५ हजार आंदोलकांची मर्यादा घालण्यात आली असताना प्रत्यक्षात तब्बल ४० हजार आंदोलक जमा झाले होते. वाहनांना केवळ वाडीबंदर जंक्शनपर्यंत परवानगी असताना सुमारे ५ हजार वाहने थेट आझाद मैदान आणि परिसरापर्यंत पोहोचली, ज्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. या आंदोलनादरम्यान मोर्चे काढणे, रास्ता रोको, घोषणाबाजी आणि गैरवर्तनाच्या घटना घडल्या होत्या, तसेच १३ दखलपात्र गुन्हे दाखल झाल्याचेही पोलिसांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. आगामी गणेशोत्सवाचा काळ आणि सुरक्षेची आव्हाने पाहता यंदाच्या आंदोलनाला परवानगी देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा