केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यात शेतकरी, तरुणांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिला आणि शेतकऱ्यांकडे सरकारचे विशेष लक्ष असणार असल्याचे त्यांनी सुरुवातीलाचं सांगितले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पाविषयी भाष्य करताना हा अर्थसंकल्प विशेष दिलासा देणारा असेल असा विश्वास व्यक्त केला होता.
कृषी, लघू मध्य उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार इंजिन्स असल्याचे सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. दरम्यान, महिलांसाठी अर्थसंकल्पात या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दोन कोटी रुपयांच्या मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक महिलांना देण्यात येणार आहे. २०२५- २६ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, त्या म्हणाल्या की लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी एक उत्पादन मिशन तयार केले जाईल. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
रुग्णांसाठी मोठा दिलासा; कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय!
बळीराजाला दिलासा! किसान क्रेडीट कार्डवरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांवर
दिलासादायक! व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ७ रुपयांची घट
दिल्ली निवडणुकीपूर्वी ‘आप’ला दणका; आठ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!
याशिवाय सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना सुरू करण्यात येणार आहे. ८ कोटीहून अधिक लहान मुलांना पोषणमूल्य मिळणार आहे. स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून एससी/ एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत करण्यात येणार आहे. देशभरातील १ कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना, १ लाख किशोरवयीन मुलींना पोषणमूल्य वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.