25 C
Mumbai
Thursday, March 30, 2023
घरअर्थजगतअदानींचं जबरदस्त पुनरागमन, जाणून घ्या कोणते शेअर्स किती वाढले

अदानींचं जबरदस्त पुनरागमन, जाणून घ्या कोणते शेअर्स किती वाढले

हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम १० दिवसांत ओसरला

Google News Follow

Related

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपचे शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग घसरण सुरू होती. हिंडेनबर्ग अहवालाचा परिणाम १० दिवसांत ओसरला आहे. आता अदानीच्या शेअर्सच्या घसरणीला ब्रेक लागला असून गुंतवणूकदार जोरदार खरेदी करत आहेत.

अदानीच्या शेअर्सनी मंगळवारी घेतलेली उसळी दुसरी दिवशीही कायम राहिली. शेरबाजार उघडताच बुधवारीही अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बीएसईवर आज सुरुवातीच्या व्यवहारात १०.२७% वाढून १९८७.६० रुपयांवर पोहोचले. याशिवाय, अदानी विल्मारच्या शेअर्सने आज सलग दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी ५ % च्या वरच्या सर्किटला धडक दिली आहे.

अदानींच्या शेअर्सची स्थिती
सकाळी बाजाराच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन, एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर, एनडीटीव्ही या कंपन्यांचे शेअर्स तेजीत व्यवहार करताना दिसले. बाजाराच्या सुरुवातीला अदानी एंटरप्रायझेसने १० टक्क्यांनी उसळी घेऊन १९८३.२० रुपयांवर पोहोचला . अदानी पोर्टमध्ये ५.०४ टक्क्यांनी वाढू होऊन ५८१.२० रुपयांवर गेला . अदानी विल्मर बाजार सुरु झाल्यावर ४१९.३५ रुपयांवर पोहोचला. अदानी पॉवरचे शेअर्स १७६.९० (+२.०५%) वर, अंबुजा सिमेंटचा शेअर ३९६ (+३.२१%), अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स १२८९.२० (+३.००%) रुपयांवर पोहोचले एससीसीच्या समभागांमध्येही जोरदार तेजी दिसून आली.

हे ही वाचा:

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

रेपो दरात वाढ.. गृहकर्जाचा हप्ता महागणार

३०,००० जखमी..६,००० इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर.. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो

श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली

अदानींच्या कंपन्यांचे उत्कृष्ट निकाल
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या डिसेंबर तिमाहीतील उत्कृष्ट निकालांमुळे शेअर्समध्ये तेजी आहे. आतापर्यंत अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट आणि अदानी ग्रीनचे निकाल जाहीर झाले आहेत. आज बुधवारी अदानी विल्मर आणि अदानी पॉवरचे निकाल जाहीर होणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा